धरमशाला : येथे झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर (India vs Srilanka) शानदार विजय मिळवला. श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आणि रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) भारताच्या विजयाचे हिरो ठरले. दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 58 धावांची विजयी भागीदारी केली. श्रेयसच्या 44 चेंडूत नाबाद 74 धावा आणि रवींद्र जाडेजाच्या 18 चेंडूत नाबाद 45 धावांच्या बळावर भारताने श्रीलंकेवर सात विकेट राखून विजय मिळवला. भारताने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. उभय संघांमध्ये आज तिसरा सामना खेळवला जाणार आहे. भारताने मालिका कालच खिशात घातली आहे त्यामुळे आज होणारा तिसरा सामना फक्त औपचारिकता मात्र आहे. T20 मालिकेतील शेवटचा सामना धरमशाला येथे खेळवला जाणार आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानावर रविवारी हा सामना होणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा T20 सामना कधी खेळवला जाईल? भारत आणि श्रीलंका
यांच्यातील दुसरा T20 सामना 27 फेब्रुवारी (रविवार) रोजी खेळवला जाणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा T20 सामना कुठे खेळवला जाईल? भारत आणि श्रीलंका
यांच्यातील हा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा T20 सामना कधी सुरू होईल? भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा
सामना संध्याकाळी 07:00 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक संध्याकाळी 6:30 वाजता होईल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) कुठे पाहू शकता?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या T20I सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?
सबस्क्रिप्शनसह हॉटस्टारवर सामन्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.
इतर बातम्या