मुंबई | टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील आपला पुढील सामन्यात श्रीलंका विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका टीमचा या स्पर्धेतील सातवा सामना असणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या 6 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेला 6 मधून फक्त 2 सामन्यातच विजय मिळवण्यात यश आलं आहे. टीम इंडियाचं सेमी फायनलचं तिकीट जवळपास निश्चित झालंय. मात्र टीम इंडिया श्रीलंकेला पराभूत करत स्वत:च्या जोरावर सेमी फायनलचं तिकीट नक्की करण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे. या सामन्याला 2 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे.
टीम इंडियाने 6 मधून 6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडिया 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी आहे. टीम इंडियाचा नेट रनरेट हा +1.405 इतका आहे. तर श्रीलंकाचा 2 विजयांसह 0.275 इतका नेट रनरेट आहे. श्रीलंका पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र त्यानंतरही श्रीलंका टीम सेमी फायनलच्या शर्यतीत कायम आहे. मात्र श्रीलंकासाठी सेमी फायनलचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. दरम्यान टीम इंडिया श्रीलंका यांच्यात कोण वरचढ आहे हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया – श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 167 सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडिया या 167 सामन्यांपैकी बहुतांश सामन्यांमध्य श्रीलंकेवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 167 मधून 98 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर श्रीलंकाने 57 वेळा टीम इंडियाला पराभूत केलंय. तर दोन्ही संघ वर्ल्ड कपमध्ये एकूण 8 वेळा भिडले आहेत. इथे मात्र हिशोब बरोबरीचा आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका दोन्ही संघांनी प्रत्येकी 4-4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे गुरुवारचा सामना जिंकून कोणती टीम विजयी पंच लगावते याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर आणि इशान किशन.
वनडे वर्ल्ड कपसाठी श्रीलंका टीम | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महेश तीक्षना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा आणि कुसल परेरा.