IND vs SL : धोनीच्या तालमीत तयार झालेल्या पाथिरानाची घातक गोलंदाजी, यॉर्करवर पंड्याची शरणागती, पाहा Video

| Updated on: Jul 27, 2024 | 10:42 PM

टीम इंडिया आणि श्रीलंकेमधील पहिल्या टी-20 सामन्यात पाथिरानाने दमदार गोलंदाजी केली. हार्दिक पंड्याला त्याने तब्बल 151 किमी प्रतितास वेगाने टाकलेल्या घातक यॉर्करचा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय.

IND vs SL : धोनीच्या तालमीत तयार झालेल्या पाथिरानाची घातक गोलंदाजी, यॉर्करवर पंड्याची शरणागती, पाहा Video
Follow us on

टीम इंडिया आणि श्रीलंकेमधील पहिल्या टी-20 सामन्यात युवा खेळाडूंनी दमदार फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 213-7 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने श्रीलंकेला 170 वर ऑल आऊट केलं. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने 58 धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या बॉलर्सचा घाम काढला. पण एक बॉलर ज्याने टीम इंडियाच्या महत्त्वाच्या चार विकेट घेत रनरेटवर अंकुश घातला. हा बॉलर म्हणजे आयपीएलमधील सीएसकेमध्ये धोनीच्या तालमीत तयार झालेला मथीशा पाथिराना. पठ्ठ्याने हार्दिक पंड्याला टाकलेला यॉर्कर तर एकदम झकास होता.

पाथिरानाने टीम इंडियाचा स्टार ऑल राऊंडर हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, रियान पराग आणि रिषभ पंत या महत्त्वाच्या चार विकेट घेतल्या. यामधील सर्वात कडक विकेट हार्दिक पंड्याची होती. हार्दिक पंड्याला काही समजण्याआधी तो बोल्ड झा्ला. 151 किमी प्रतितास  वेगाने टाकला होता. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

 

 

टीम इंडियाची बॅटींग

टीम इंडियाकडून शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार सलामी दिली होती. दोघांनी 74 धावा केल्या होत्या, मात्र दोघे लागोपाठ बाद झाले. त्यानंतर  सूर्यकुमार यादव याने आपला दांडपट्टा सुरू केला. 8 चौकार 2 षटकारांच्या मदतीने अवघ्या 26 बॉलमध्ये 58 धावा केल्या. रिषभ पंतनेही शेवटपर्यंत थांबत 49 धावा केल्या. श्रीलंकेकडून मथीशा पाथिरानाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असालंका (कर्णधार), दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका.

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), रियान पराग, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.