मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. वर्ल्ड कपमध्ये सर्व संघांना पुरून उरलेल्या रोहित शर्माला पहिल्याच ओव्हरमध्ये माघारी पाठवलं. रोहित शर्माला दुसऱ्याच बॉलवर बोल्ड करत संघाला मोठं यश मिळवून दिलं. सोशल मीडियावर रोहितचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.
रोहित शर्माने पहिल्या बॉलवर खणखणीत चौकार मारला. मात्र दुसऱ्या बॉलवर बॉलरने कमबॅक भारताला जोर का झटका दिला. श्रीलंकेचा बॉलर दिलशान मदुशंकाने सुरूवातील कडक स्पेल टाकला. शुबमन गिल याला तर खातं उघडण्यासाठी सात ते आठ बॉल लागले. त्यानंतर गिलने वेळ घेतला आणि श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरूवात केली.
रोहित आऊट झाल्यावर भारतीय संघ अडचणीत सापडला होता. मात्र विराट कोहली आणि शुबमन गिल या दोघांनी डाव सावरला, दोघांनीही अर्धशतर केलं असून नाबाद आहेत. सुरूवातीला दोघांनी सावध खेळ केला, एकदा मैदानाचा अंदाज आल्यावर चांगल्या धावगतीने धावा केल्या.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (W/C), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका