मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यामधील सामन्यामध्ये भारतीय संघाने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताचा हा सलग सातवा विजय आहे. भारताच्या 358 धावांचा पाठलाग करणारा श्रीलंका संघाचा डाव 55 वर आटोपला. या विजयासह भारत यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. या सामन्यामध्ये सचिन तेंडुलकर याची मुलगी सारासुद्धा वानखेडेवर सामना पाहायला आली होती. सारा आल्यावरस भारतीय चाहते शुबमनच्या नावाचा गजर सुरू करतात. गुरूवारच्याही सामन्यात असंच काहीसं झालं फक्त विराटने याला काहीसा तडका दिला.
भारताने पहिल्यांद बॅटींग करत श्रीलंकेसमोर 358 धावांचं आव्हान दिलेलं, या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचा संघ उतरला खरा पण भारतीय वेगवान गोलंदाजांनी लंकेच्या संघाला आपल्यासमोर गुडघे टेकायला सुरूवात केली. यादरम्यान भारतीय संघ फिल्डिंग करताना स्लीपला उभे असलेले भारतीय विराट कोहली आणि शुबमन गिल यांचं वेगळंच काहीतरी सुरू होतं.
विराट मैदानावर असताना खेळाडूंचा उत्साह वाढवताना आपण त्याला पाहिलं आहे. त्यासोबतच तो फिल्डिंग चाहत्यांचाही उत्साहित करतो. काल झालेल्या सामन्यातही त्याने तसंच काहीसं केलं फरक इतकाच की त्याने चाहत्यांना गिलचं नाव घ्यायला लावलं. सामना सुरू असताना सगळे सारा…सारा… ओरडत होते, त्यावेळी विराटने प्रेक्षकांना शुबमनचं नाव घ्यायला सांगितलं.
When the whole crowd was shouting “Sara”, Virat said, his name is Shubman Gill🤣🤣❤️#viratkohli #Shubmangill pic.twitter.com/DzcGS8rxsn
— 𝙒𝙧𝙤𝙜𝙣🥂 (@wrogn_edits) November 2, 2023
Virat Kohli telling us not to shout “hamari bhabhi kaisi ho sara bhabhi jaisi ho”
He saying the Wankhede crowd to cheer for Shubman Gill.#ShubmanGill #INDvsSL #SLvIND#ViratKohli #ICCWorldCup2023 pic.twitter.com/s6dEnq07Rw— Sara Tendulkar (@SaraTendulkarI) November 2, 2023
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (W/C), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका