IND vs SL मॅचमध्ये ज्याला टीममधून काढायची तयारी, त्यानेच जिंकलं गोल्ड मेडल, कोण आहे तो?

| Updated on: Nov 03, 2023 | 9:46 PM

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये झालेल्या सामन्यानंतर ज्या खेळाडूला सर्वोत्कृष्ट फिल्डिंगचं गोल्ड मिळालं त्याच्या खेळण्याबाबत साशंकता होता. मात्र त्या खेळाडूने गोल्ड मेडलच नाहीतर दमदार कामगिरी केली.

IND vs SL मॅचमध्ये ज्याला टीममधून काढायची तयारी, त्यानेच जिंकलं गोल्ड मेडल, कोण आहे तो?
Follow us on

मुंबई : वर्ल्ड कपमधील भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यामध्ये रोहितसेनेने लंकेच्या फलंदाजांना चारीमुंड्या चीत केलं. भारताच्या 358 धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघ अवघ्या 55 धावांवर ऑल आऊट झाला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एक प्रथा सुरू झाली ती म्हणजे सामना संपल्यानंतर त्यामध्ये सर्वोत्कृष्ट फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूला गोल्ड मेडल दिलं जातं. भारत-श्रीलंका सामना झाल्यावर एका अशा खेळाडूल गोल्ड मेडल देण्यात आलं ज्याला श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात बाहेर बसवलं जाईल असं वाटलं होतं. नेमका कोण आहे तो खेळाडू? जाणून घ्या.

भारत-श्रीलंका सामन्यानंतर फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांनी सामना संपल्यानंतर ज्या खेळाडूला हे मेडल देण्यात आलं त्याला प्लेइंग 11 मध्ये ठेवतील की नाही याबाबत शंका होती. मात्र पठ्ठ्याने दमदार कामगिरी करत आपली ताकद सर्वांना दाखवून दिली. या खेळाडूला मेडल क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने दिलं.  सचिन हे मेडल देताना तिथे उपस्थित नव्हता टीव्हीवर  त्याने खेळाडूचं नाव घोषित केलं.

दोन खेळाडूंची झालेली निवड

कोच श्रीधर यांनी या पदकासाठी दोन नावांची निवड केली होती. रविंद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर यामधील अय्यरला ह गोल्ड मिळालं. अय्यरची मागील सामन्यांमधील कामगिरी पाहता त्याने पाकिस्तान संघाविरूद्धची खेळी वगळता त्याने खास असं काही केलं नव्हतं. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात अय्यरने आक्रमक खेळी करत संगाचा धावसंख्या 350 पार नेण्यात महत्त्वाची भूमिका साकारली.

दरम्यान, शुबमन गिल आणि विराट कोहली बाद झाल्यावर अय्यर याने स्कोरबोर्ड फक्त हलताच नाहीतर पळवला होता. अय्यरे आपल्या ८६ धावांच्या खेळीमध्ये 6 षटकार आणि 3 चौकार मारले होते. अय्यर शतक करणार असंच वाटत होतं मात्र तसं झालं नाही. चाहत्यांचीह इच्छा होती की, कोहली आणि गिलचं शतक नाही झालं तर अय्यरचं तरू व्हावं मात्र तिघेही शतकापासून वंचित राहिले.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (W/C), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका