Asia Cup 2023 : ‘भारत-श्रीलंका सामना फिक्स होता’; फोन आल्याचं सांगत माजी खेळाडूचा व्हिडीओ होतोय व्हायरल

| Updated on: Sep 14, 2023 | 9:41 AM

भारत-श्रीलंका सामाना अत्यंत चुरशीचा झालेला पाहायला मिळाला होता. या सामन्यामध्ये भारताच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली आणि सामना जिंकून दिला. मात्र फलंदाजांनी खराब कामगिरी केली, अशातच याावरून सामना फिक्स असल्याची चर्चा झाली.

Asia Cup 2023 : भारत-श्रीलंका सामना फिक्स होता; फोन आल्याचं सांगत माजी खेळाडूचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Follow us on

मुंबई : आशिया कपमधील सुपर-4 फेरीमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेला सामना रोमांचक ठरला. हा सामना भारतीय संघाने 41 धावांनी जिंकला. या सामन्यामध्ये भारताच्या गोलंदाजांनी कमबॅक करून देत सामना जिंकवला होता. मात्र भारतीय फलंदाजांनी नांगीच टाकल्याचं पाहायला मिळालं होतं. याबाबत बोलताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भारताने हा सामना फिक्स केला असं म्हटल्याचं एका व्हिडीओमध्ये दिसत आहे.

काय म्हणाला शोएब अख्तर?

भारताने श्रालंकेचा सामना जिंकत फायनलचं तिकीट निश्चित केलंच पण त्यासोबत पाकिस्तानसाठीसुद्धा फायनलसाठीचा मार्ग खुला केला. मात्र भारत-श्रीलंका सामना सुरू असताना भारताच्या फलंदाज ज्या प्रकारे आऊट झाले त्यावरून पाकिस्तानला बाहेर करण्यासाठी ते अशा प्रकारे खेळत असल्याचं सोशल मीडियावर बोललं जात होतं. हा आरोप खोटा असल्याचं अख्तर म्हणाला.

पाहा व्हिडीओ-

मला समजलं नाही तुम्ही असं का करत आहात. भारताने सामना फिक्स केल्याचे मीम्स आणि मेसेज मला आले. पाकिस्तान संघाला स्पर्धेमधून बाहेर करण्यासाठी ते मुद्दाम असे खेळल्याचं सांगितलं. पण तुम्ही पाहिलं असेल की श्रीलंकेच्या 20 वर्षाच्या वेल्लालागे याने काय बॅटींग केली. पण मला अनेक जणांनी फोन करत भारत मुद्दाम सामना हरणार असल्याचे फोन केले.

भारतीय संघ का हरेल त्यांना फायनलमध्ये जायचं नाही का? तुम्हा कारण नसताना कसले पण मीम्स बनवत आहात. कुलदीप यादव याने खतरनाक गोलंदाजी केली. जसप्री बुमराह यानेही जबरदस्त सुरूवात केल्याचं शोएब अख्तर म्हणाला.

दरम्यान, भारत श्रीलंका सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा डाव 213 धावांवर आटोपला होता. वेल्ललागे याने 5 विकेट्स घेत भारतीय संघाच्या फलंदाजील सुरूंग लावला होता. त्यानंतर भारताच्या वेगवान गोलंदाजांनी जोरदार कमबॅक करून दिलं. जसप्रीत बुमराह  आणि कुलदीप यांच्या माऱ्यासमोर श्रीलंकेच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही.