सांगलीकर Smriti Mandhana चा कारनामा, भारतीय फलंदाजाकडून वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

| Updated on: Dec 17, 2024 | 11:24 PM

Smriti Mandhana World Record : सांगलीकर स्मृती मंधाना हीने विंडिज विरूद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यात अर्धशतकी खेळी करत इतिहास रचला आहे. स्मृतीने वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

सांगलीकर Smriti Mandhana चा कारनामा, भारतीय फलंदाजाकडून वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
Smriti Mandhana women team india
Image Credit source: bcci women X Account
Follow us on

भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी खेळाडू स्मृती मंधाना हीने विंडिज विरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात इतिहास रचला. स्मृतीने नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात इतिहास घडवला. स्मृतीने या सामन्यात एकूण 62 धावांची खेळी केली. स्मृतीने या दरम्यान 8 चौकारांच्या मदतीने 37 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. स्मृतीचं हे सलग दुसरं तर एकूण 29 वं टी 20i अर्धशतक ठरलं. स्मृतीने या अर्धशतकी खेळीसह वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. स्मृती संयुक्तरित्या सर्वाधिक टी 20 अर्धशतकं करणारी महिला क्रिकेटर ठरली आहे. स्मृतीने न्यूझीलंडच्या सुझी बेट्स हीच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केलीय.

सर्वाधिक टी 20i अर्धशतकं

  • सुझी बेट्स : 29
  • स्मृती मंधाना : 29
  • बेथ मूनी : 25
  • स्टॅफनी टेलर : 22
  • सोफी डीव्हाईन : 22

विंडिजकडून पलटवार भारताचा पराभव

दरम्यान कॅप्टन स्मृती मंधाना हीच्या 62 धावांच्या खेळीनंतरही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने विंडिजला विजयसाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. विंडिजने हे आव्हान फक्त 1 विकेट गमावून सहज पूर्ण केलं. विंडिजने या विजयासह पहिल्या पराभवाचा वचपा घेतला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.

हे सुद्धा वाचा

स्मृती मंधाना जगात भारी, वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

वूमन्स इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना (कर्णधार), उमा चेत्री, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), राघवी बिस्त, सजीवन सजना, दीप्ती शर्मा, राधा यादव, सायमा ठाकोर, तितास साधू आणि रेणुका ठाकूर सिंग.

वूमन्स विंडीज प्लेइंग इलेव्हन : हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेले (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, नेरिसा क्राफ्टन, शबिका गजनबी, जैदा जेम्स, अश्मिनी मुनिसार, ऍफी फ्लेचे आणि करिश्मा रामहरक.