AUS vs IND: टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर 11 चं आव्हान, सामना केव्हा?

| Updated on: Aug 09, 2024 | 4:47 PM

India Tour Of Australia 2024 : रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर ईलेव्हन विरुद्ध सामना खेळणार आहे. जाणून घ्या वेळापत्रक.

AUS vs IND: टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर 11 चं आव्हान, सामना केव्हा?
IND VS AUS TEST
Image Credit source: bcci
Follow us on

टीम इंडिया या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. उभयसंघात एकूण 2 महिने 5 कसोटी सामन्यांची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. या मालिकेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये एका डे नाईट सामन्याचा समावेश आहे. भारताची ऑस्ट्रेलिया विरुद्ध दिवस रात्र सामन्यात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. मात्र यंदा तसं काही होऊ नये, म्हणून खबरदारी घेत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

टीम इंडिया 2020-21 नंतर पहिल्यांदा कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. मात्र टीम इंडियाची गेल्या दौऱ्यातील डे नाईट मॅचमधील कामगिरी ही फारच निराशाजनक राहिली होती. अॅडलेडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव हा अवघ्या 36 धावांवर आटोपला होता. मात्र भारताने त्यानंतर दणक्यात कमबॅक करत अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात ती मालिका जिंकून इतिहास रचला होता.

मात्र यंदा तसं काही होऊ नये म्हणून डे नाईट मॅचआधी उभयसंघात 2 दिवसांची डे-नाईट प्रॅक्टिस मॅच खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उभसंघात 30 नोव्हेंबर- 1 डिसेंबर भारतासमोर ऑस्ट्रेलियाच्या प्राईम मिनिस्टर 11 चं आव्हान असणार आहे. हा सामना कॅनबेरा येथे खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाने गेल्या 2 वर्षात एकही रात्र-दिवस कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे भारतासाठी सरावाच्या हिशोबाने हा सामना अतिशय फायदेशी असा ठरणार आहे. तसेच हेड कोच गौतम गंभीर याची ही दुसरीच कसोटी मालिका असणार आहे. त्यामुळे गंभीरच्या अनुभवाचाही इथे चांगलाच कस लागणार आहे.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं वेळापत्रक

  • पहिला सामना, 22-26 नोव्हेंबर, पर्थ
  • दुसरा सामना, 6-10 डिसेंबर, अॅडलेड (डे-नाईट)
  • तिसरा सामना, 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
  • चौथा सामना, 16-30, मेलबर्न
  • पाचवा सामना, 3-7 जानेवारी, सिडनी

टीम इंडियाचा 2 दिवसीय सराव सामना

दरम्यान टीम इंडियाने एकूण 4 पैकी भारतात खेळलेल्या 3 रात्र-दिवस सामन्यात विजय मिळवला आहे. तर परदेशात झालेल्या एकमेव सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभूत व्हावं लागलं आहे. तर ऑस्ट्रेलियाने 12 पैकी तब्बल 11 सामने जिंकले आहेत, तर एकमेव सामना हा गमावला आहे.