BCCI ने पेटारा उघडला, कसोटी खेळणाऱ्या खेळांडूवर पैशांचा पाऊस, जय शाह यांची मोठी घोषणा

| Updated on: Mar 09, 2024 | 5:10 PM

IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील पाचव्या कसोटी सामन्यामध्ये रोहित अँड कंपनीने इंग्लिश संघाला 4-1 ने धूळ चारली. पाचव्या सामन्यात डावाने विजय मिळवल्यानंतर जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. आता कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. नेमके किती पैसे मिळणार जाणून घ्या.

BCCI ने पेटारा उघडला, कसोटी खेळणाऱ्या खेळांडूवर पैशांचा पाऊस, जय शाह यांची मोठी घोषणा
Follow us on

मुंबई : टीम इंडियाने इंग्लंड संघाला पाचव्या कसोटी सामन्यामध्ये एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यामधील विजय हा ऐतिहासिक ठरला आहे. इग्लंड संघाने पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभूत करत कडक सुरूवात केली होती. मात्र टीम इंडियाने चारही सामन्यात मुसंडी मारत इंग्लंड संघाला चारीमुंड्या चीत केलं. टीम इंडियाच्या विजयानंतर बीसीसीआयनेही आपला पिटारा उघडला आहे. बीसीसीसआयचे सचिव जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. आता कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार आहे.

कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंना आता सामन्याच्या मानधनाशिवाय आणखी पैसे मिळणार आहेत. जय शाह यांनी याबाबतची माहिती दिली आहे.  कसोटी क्रिकेटकडे खेळाडू आता कानाडोळा करू लागल्याने बीसीसीआयनेही अशा प्रकारे डोकं लावलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्याचे प्रत्येक खेळाडूला 15 लाख इतकं मानधन मिळतं. पण आता है पैसे तर मिळणारच आहेत. पण बोनसप्रमाणे आणखी काही एक ठराविर रक्कम खेळाडूंना मिळणार आहे. नेमके किती पैसे आणि कोणत्या खेळाडूंना मिळणार जाणून घ्या.

खेळाडूंना मिळणार किती पैसे?

एका खेळाडूने एका सीझनमध्ये 75 टक्के (7 किंवा त्याहून अधिक) कसोटी सामने खेळले तर त्याला प्रत्येक सामन्याचे 45 लाख रुपये मिळणार आहेत. 50 टक्के म्हणजे (5 किंवा 6 अधिक) कसोटी खेळणाऱ्यांना प्रति सामना 30 लाख रुपये आणि जे खेळाडू प्लेइंग 11 चा भाग नसतीला त्यांना 15 कोटी एका सामन्याचे मिळणार आहेत. जर एखाद्या खेळाडूने एकी सीझनमध्ये 9 कसोटी सामने असतील त्यातील चारही सामने खेळले नसतील तर त्यांना कोणतंही जास्तीचं मानधन मिळणार आहे.

 

दरम्यान, कसोटी क्रिकेटमधील वार्षिक केंद्रीय करारामधून दोन खेळाडूंना बाहेर ठेवण्यात आलं. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर अशी दोन्ही खेळाडूंची नावे आहेत. बीसीसीआयने दणका दिल्यावर अय्यर रणजीमध्ये मुंबईकडून खेळण्यासाठी तयार झाला. बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे आता खेळाडूंच्या माणसिकतेमध्ये काही बदल होतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.