IND W vs AUS W | पाटलांच्या पोरीचा ऑस्ट्रेलियाला दणका, दुसऱ्याच सामन्यात केला पर्फेक्ट गेम

| Updated on: Jan 02, 2024 | 7:14 PM

Shreyanaka Patil wicket video : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या वन डे सामन्यामध्ये श्रेयांका पाटील हिने चमकदार कामगिरी केली आहे. श्रेयांकाने ऑस्ट्रेलियाच्या मुख्य खेळाडूंना पहिल्याच चेंडूवर माघारी धाडलं आहे.

IND W vs AUS W | पाटलांच्या पोरीचा ऑस्ट्रेलियाला दणका, दुसऱ्याच सामन्यात केला पर्फेक्ट गेम
Follow us on

मुंबई : वुमन्स ऑस्ट्रेलिया आणि वुमन्स टीम इंडिया यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील आज शेवटचा आणि तिसरा वन डे सुरू आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा सामना सुरू असून ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम बॅटींग केली होती. या सामन्यात 50 ओव्हरमध्ये 338-7 धावा केल्या आहेत. या सामन्यात श्रेयांका पाटील हिने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडू बेथ मुनी आणि ताहलिया मॅकग्रा यांना पहिल्याच बॉलवर माघारी पाठवलं.

टीम इंडियाच्या गोलंदाजांचा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी घाम काढला होता. ओपनर फोबी लिचफील्ड आणि अॅलिसा हिली यांनी 189 धावांची भागीदारी केली होती.  पूजा वस्त्राकर हिने अॅलिसा हिलीला आऊट करत भागीदारी फोडली. त्यानंतरअमनजोत कौरने दुसर यश मिळवून दिलं होतं. त्यानंतर आलेल्या बेथ मुनी आणि ताहलिया मॅकग्रा यांना लागोपाठ आऊट करत श्रेयांकाना ऑस्ट्रेलियाला बॅकफूटला ढकललं होतं.

पाहा व्हिडीओ-

 

श्रेयांका पाटील हिने दुसऱ्या वन डे सामन्यामध्ये पदार्पण केलं होतं. आजचा तिसरा वन डे हा श्रेयांका पाटील हिचा दुसराच आंतरराष्ट्रीय सामना होता. ऑस्ट्रेलिया संघाने पहिले दोन्ही वन सामने जिंकले असून मालिका खिशात घातली आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवत शेवट गोड करतात की वर्षाच्या सुरूवातीला पराभवाच पदरी  पाडून घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): यास्तिका भाटिया, स्मृती मानधना, रिचा घोष (W), जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (C), दीप्ती शर्मा, मन्नत कश्यप, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग

ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): फोबी लिचफील्ड, अॅलिसा हिली (W/C), एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अॅशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शूट