आयसीसी महिला वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सामना सुरु आहे.ऑकलंडमध्ये सुरु असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाची फलंदाजी सुरु आहे. भारतीय संघासाठी या सामन्यात विजय खूप आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाने आजचा सामना जिंकला तर ते थेट सेमीफायनलमध्ये पोहोचतील.
दोन्ही संघांची प्लेइंग XI
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग XI: एलिसा हीली, रॅचल हॅस, मॅग लेनिंग, एलिस पेरी, बेथ मूनी, ताहिला मॅक्ग्रा, एश्ले गार्डनर. डर्सी ब्राउन, जेस जोनासेन, अलाना किंग, मेगान शूट
भारताची प्लेइंग XI: स्मृति मांधना, यास्तिका भाटिया, मिताली राज, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, स्नेह राणा, ऋचा घोष, पूजा वस्त्राकर, झूलन गोस्वामी, मेघना सिंह, राजेश्वरी गायकवाड़
अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला 8 धावांची अवश्यकता असताना बेथ मूनी हिने पहिल्या चेंडूवर शानदार चौकार लगावला, तर पुढच्या चेंडूवर दोन धावा वसूल केल्या. चार चेंडूत 2 धावांची आवश्यकता असताना मूनी हिने अजून एक चौकार लगावत 278 धावांचं लक्ष्य पार केलं.
49 षटकात ऑस्ट्रेलियाने 4 बाद 270 धावांपर्यंत मजल मारली आहे. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला 8 धावांची गरज आहे. भारताची कर्णधार मिताली राजने चेंडून अनुभवी झुलन गोस्वामीच्या हाती सोपवला आहे.
भारतीय गोलंदाजांना चौथं यश मिळालं आहे. 49 व्या षटकात मेघना सिंह हिने ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग हिला 97 धावांवर असताना पूजा वस्त्राकरकरवी झेलबाद केलं. लॅनिंगने 107 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 97 धावा फटकावल्या.
पूजा वस्त्राकरने भारताला तिसरी विकेट मिळवून दिली आहे. तिने एलिस पेरीला 28 धावांवर असताना मिताली राजकरवी झेलबाद केलं.
पावसामुळे सामना स्थगित करण्यात आला आहे. दरम्यान, आतापर्यंत सामन्यावर ऑस्ट्रेलियाने चांगली पकड निर्माण केली आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 9 षटकात 53 धावांची आवश्यकता आहे. त्यांचे अद्याप 8 फलंदाज शिल्लक आहेत.
अर्धशतकवीर कर्णधार मॅग लेनिंग (62) आणि एलिस पेरी (16) या दोघींनी ऑस्ट्रेलियाचा डाव 200 पार नेला आहे. 36 षटकात ऑस्ट्रेलियाने धावफलकावर 201 धावा झळकावल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला 85 चेंडूत 77 धावांची आवश्यकता आहे.
सलामीची जोडी बाद झाल्यानंतर कर्णधार मॅग लेनिंग (27) आणि एलिस पेरी (5) या दोघींनी ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे नेला आहे. 27 षटकात ऑस्ट्रेलियाने धावफलकावर 154 धावा झळकावल्या आहेत. 27 व्या षटकात मेघना सिंहच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार वसूल करत लेनिंगने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ऑस्ट्रेलियाला 23 षटकात 124 धावांची आवश्यकता आहे.
पूजा वस्त्राकरने भारताला दुसरं यश मिळवून दिलं आहे. तिने सलामीवीर रॅचल हाईन्सला 43 धावांवर असताना यष्टीरक्षक ऋचा घोषकरवी झेलबाद केलं. (ऑस्ट्रेलिया 123/2)
स्नेह राणाने भारताला पहिलं यश मिळवून दिलं आहे. तिने आक्रमक फटकेबाजी करत असलेल्या एलिसा हीलीला मिताली राजकरवी झेलबाद केलं. एलिसाने 65 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 72 धावा फटकावल्या.
ऑस्ट्रेलियाची सलामीवीर एलिसा हीलीची (56 चेंडूत 66) जोरदार फटकेबाजी सुरुच आहे. अर्धशतक झळकावल्यानंतर ती अजून आक्रमक झाली आहे. 17 व्या षटकात तिने राजेश्वर गायकवाडच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार वसूल करत धावफलकावर ऑस्ट्रेलियाचं शतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी अद्याप भारतीय गोलंदाजांना कोणतंही यश मिळू दिलेलं नाही.
ऑस्ट्रेलियाची सलामीवीर एलिसा हीली हिने 49 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं आहे. (ऑस्ट्रेलिया : 15 षटकात बिनबाद 88 धावा)
ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी आपल्या डावाची दणक्यात सुरुवात केली आहे. सलामीवीर जोडीने अवघ्या 7 षटकात धावफलकावर अर्धशतक पूर्ण केलं आहे. रॅचल हाईन्सने 7 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर राजेश्वरी गायकवाडला शानदार चौकार लगावत संघाचा 50 धावा पूर्ण केल्या.
ऑस्ट्रेलियाची सलामीवीर एलिसा हीलीने आक्रमक सुरुवात केली आहे. तिने आतापर्यंत 20 चेंडूत 5 चौकारांसह 29 धावा फटकावल्या आहेत. 5 व्या षटकात तिने झुलन गोस्वामीला सलग दोन अप्रतिम चौकार लगावत आपला क्लास दाखवला. (ऑस्ट्रेलिया – 38/0)
278 धावांचं लक्ष्य घेऊन ऑस्ट्रेलियाची टीम मैदानात दाखल झाली आहे. सलामीवीर एलिसा हीली आणि रॅचल हाईन्स क्रीझवर.
अखेरच्या षटकांमध्ये हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकारने चांगली फटकेबाजी केली. भारताने निर्धारीत 50 षटकात सहा बाद 277 धावा केल्या. हरमनप्रीत 57 धावांवर नाबाद राहिली. पूजा शेवटच्या चेंडूवर 34 धावांवर रनआऊट झाली.
मेगन टाकत असलेल्या 49 व्या षटकात पूजा वस्त्राकारने पाचव्या चेंडूवर शानदार षटकार लगावला. भारताच्या सहा बाद 269 धावा झाल्या आहेत. हरमनप्रीत 52 आणि पूजा 31 धावांवर खेळतेय..
हरमनप्रीत कौरने शानदार अर्धशतक झळकावलं आहे. 42 चेंडूत तिने 50 धावा केल्या. यात सहा चौकार लगावले.
फिरकी गोलंदाज किंगच्या षटकात पूजा वस्त्राकारने फटकेबाजी केली. तिने दोन चौकार आणि एका षटकारासह 16 धावा वसूल केल्या. हरमनप्रीत 41 आणि पूजा 17 धावांवर खेळतेय. 46 षटकात भारताच्या सहाबाद 243 धावा झाल्या आहेत.
45 षटकात भारताच्या सहाबाद 225 धावा झाल्या आहेत. हरमनप्रीत कौर 36 आणि पूजा वस्त्राकार सहा धावांवर खेळतेय.
रिचा घोषनंतर स्नेह राणा आल्यापावली माघारी परतली. जोनासेनने तिला क्लीनबोल्ड केलं. भारताच्या चार बाद 216 धावा झाल्या आहेत.
40 षटकात भारताच्या चार बाद 200 धावा झाल्या आहेत. हरमप्रीत 21 आणि रिचा घोष पाच धावांवर खेळतेय.
भारताला 186 धावांवर चौथा झटका बसला. सेट झालेली कॅप्टन मिताली राज 68 धावांवर आऊट झाली. तिने 96 चेंडू घेतले. आपल्या खेळीत मितालीने चार चौकार आणि एक षटकार लगावला. फिरकी गोलंदाज किंगच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नाने मिताने पेरीकडे झेल दिला. 38 षटकात भारताच्या चार बाद 192 धावा झाल्या आहेत.
34 षटकात भारताच्या तीन बाद 172 धावा झाल्या आहेत. मिताली राज 63 आणि हरमनप्रीत कौर तीन धावांवर खेळतेय. मितालीने शेवटच्या चेंडूवर शानदार चौकार खेचला.
हाफ सेंच्युरी झळकावल्यानंतर यास्तिका भाटिया मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आऊट झाली. तिने 83 चेंडूत 59 धावा केल्या. ब्राऊनच्या गोलंदाजीवर तिने पेरीकडे सोपा झेल दिला. भारताची स्थिती तीन बाद 158 आहे.
मिताली राज पाठोपाठ यास्तिका भाटियानेही अर्धशतक झळकावलं आहे. यास्तिका 81 चेंडूत 59 धावांवर खेळतेय. तिने सहा चौकार लगावले आहेत. भारताच्या 31 षटकात दोन बाद 157 धावा झाल्या आहेत. यास्तिकाने शेवटच्या चेंडूवर थर्ड मॅनच्या दिशेने सुंदर चौकार लगावला.
संघाला गरज असताना मिताली राजने दमदार खेळ दाखवला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात तिने अर्धशतकी खेळी केली. वर्ल्ड कप सुरु झाल्यापासून तिचा फॉर्मसाठी संघर्ष सुरु होता. मिताली राजचे हे 63 वे अर्धशतक आहे. 30 षटकात भारताच्या दोन बाद 144 धावा झाल्या आहेत. मितालीने 77 चेंडूत 50 धावा केल्या. तिने या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला.
जेस जोनासेनच्या चेंडूवर कॅप्टन मिताली राजने शानदार षटकार खेचला. 28 षटकात भारताच्या दोन बाद 135 धावा झाल्या आहेत.
26 षटकात भारताच्या दोन बाद 123 धावा झाल्या आहेत. यास्तिका 39 आणि मिताली 29 धावांवर खेळतेय.
24 षटकात भारताच्या दोन बाद 109 धावा झाल्या आहेत. मॅग्राथच्या शेवटच्या चेंडूवर यास्तिकाने स्ट्रेट ड्राइव्ह मारुन शानदार चौकार खेचला.
मिताली आणि यस्तिकामध्ये अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली आहे. भारताने धावांचे शतक पूर्ण केलं आहे. 22 षटकात भारताच्या दोन बाद 101 धावा झाल्या आहेत. यास्तिका 29 आणि मिताली 30 धावांवर खेळतेय.
18 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. भारताच्या दोन बाद 83 धावा झाल्या आहेत. कॅप्टन मिताली राज आणि यास्तिका भाटीयाची जोडी मैदानात आहे. यास्तिका 25 आणि मिताली 18 धावांवर खेळतेय.
भारताचे सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा तंबूत परतल्या आहेत. स्मृतीने 10 तर शेफालीने 12 धावा केल्या आहेत.