IND vs ENG, Live Score, Women’s World Cup 2022: भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो, इंग्लंडची भारतावर 4 विकेट आणि 112 चेंडू राखून मात

| Updated on: Mar 16, 2022 | 12:17 PM

आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेत आज भारताचा इंग्लंड विरुद्ध (IND W vs ENG W) सामना होत आहे. भारतीय महिला संघाने मागचा वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना सहज जिंकला होता. आज इंग्लंड विरुद्ध त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

IND vs ENG, Live Score, Women’s World Cup 2022: भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो, इंग्लंडची भारतावर 4 विकेट आणि 112 चेंडू राखून मात
India vs England, ICC Women World Cup 2022
Image Credit source: BCCI
Follow us on

आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेत आज भारताचा इंग्लंड विरुद्ध (IND W vs ENG W) सामना होत आहे. भारतीय महिला संघाने मागचा वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना सहज जिंकला होता. आज इंग्लंड विरुद्ध त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या संघाचा संघर्ष सुरु आहे. इंग्लंडच्या महिला संघाला सलग तीन पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. भारताने मागच्या सामन्यात फॉर्ममध्ये असलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाला 155 धावांनी पराभूत केलं होतं. टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध विजय मिळवायचा आहे. त्याचबरोबर हा सामना इंग्लंडसाठी खूप महत्त्वाचा आहे. या संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही सामने गमावले आहेत. इंग्लंडच्या संघाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकायचे असेल तर त्यांना हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल.

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – डेनियाल व्याट, टॅमी ब्युमॉन्ट, हेदर नाइट, नताली सायव्हर, एमी अॅलन जोन्स, सोफिया डंक्ली, कॅथरीन ब्रंट, सोफी एक्लेस्टन, केट क्रोस, कॅरोलेट डीन, अन्या श्रबसोले

भारताची प्लेइंग इलेव्हन

भारताची प्लेइंग इलेव्हन – स्मृती मानधना, यस्तिका भाटिया, मिताली राज, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर, रिचा घोष, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, झुलन गोस्वामी, मेघना सिंग आणि राजेश्वरी गायकवाड

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 16 Mar 2022 11:45 AM (IST)

    सोफी एक्लेस्टनचा चौकार, इंग्लंडची भारतावर मात

    32 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सोफी एक्लेस्टनने मेघना सिंगला शानदार चौकार लगावला. या चौकारासह इंग्लंडच्या संघाला भारताने दिलेलं 135 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. इंग्लंडने 4 विकेट आणि 112 चेंडू राखून भारताचा दारुण पराभव केला आहे.

  • 16 Mar 2022 11:35 AM (IST)

    इंग्लंडची 6 वी फलंदाज माघारी, मेघना सिंगची तिसरी शिकार

    मेघना सिंगने आज उत्कृष्ट गोलंदाजी करत इंग्लंडचे तीन फलंदाज बाद केले आहेत. 30 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर तिने सोफिया डंक्लीला बाद केलं. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर तिने कॅथरीन ब्रंट हिला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तिने कॅथरीनला यष्टीरक्षक ऋचा घोषकरवी झेलबाद केलं.


  • 16 Mar 2022 11:30 AM (IST)

    भारताला पाचवं यश

    भारतीय गोलंदाजांना पाचवी विकेट मिळवण्यात यश मिळालं आहे. मेघना सिंगने सोफिया डंक्ली हिला 17 धावांवर असताना यष्टीरक्षक ऋचा घोषकरवी झेलबाद केलं. ऋचाने अप्रतिम झेल टिपत सोफियाला माघारी धाडलं.

  • 16 Mar 2022 11:25 AM (IST)

    कर्णधार हेदर नाईटचं अर्धशतक

    सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर इंग्लंडची कर्णधार हेदर नाईटने सामन्याची सूत्र हाती घेतली. मागील तीन सामन्यात अपयशी ठरलेल्या नाईटने या सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. तिने संयमी खेळ करत आज 66 चेंडूत 8 चौकारांसह 50 धावा जमवल्या आहेत. 28 व्या षटकात मेघना सिंगच्या गोलंदाजीवर चौकार लगावत तिने अर्धशतक पूर्ण केलं.

  • 16 Mar 2022 11:15 AM (IST)

    भारताला मोठं यश, अॅमी जोन्स 10 धावांवर बाद

    राजेश्वरी गायकवाडने भारताला चौथं यश मिळवून दिलं आहे. तिने अॅमी जोन्सला 10 धावांवर असताना हरमनप्रीत कौरकरवी झेलबाद केलं. हरमनप्रीतने शानदार झेल टीपत जोन्सला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. (इंग्लंड 102/4)

  • 16 Mar 2022 10:50 AM (IST)

    भारताला तिसरं यश, आक्रमक नताली सायव्हर माघारी

    भारतील गोलंदाजांना तिसरं यश मिळालं आहे. पूजा वस्त्राकरने आक्रमक नताली सायव्हरला झुलन गोस्वामीकरवी झेलबाद केलं. स्कायव्हरने 46 चेंडूत 45 धावा फटकावल्या.

  • 16 Mar 2022 10:40 AM (IST)

    नताली सायव्हरचे सलग दोन चौकार, इंग्लंडचं अर्धशतक

    नताली सायव्हरने 15 व्या षटकात स्नेह राणाच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार वसूल करत धावफलकावर इंग्लंडचं अर्धशतक झळकावलं आहे. सायव्हर 41 तर आणि कर्णधार हेदर नाइट 13 धावांवर खेळत आहेत.

  • 16 Mar 2022 09:52 AM (IST)

    भारताला दुसरं यश, सलामीवीर टॅमी ब्युमॉन्ट माघारी

    अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने भारताला दुसरं यश मिळवून दिलं आहे. झुलने सामन्यातील तिसऱ्या आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सलामीवीर टॅमी ब्युमॉन्टला (1) पायचित पकडलं.

  • 16 Mar 2022 09:48 AM (IST)

    भारताची दमदार सुरुवात, दुसऱ्याच षटकात पहिला बळी

    भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या डावाची दमदार सुरुवात केली आहे. सामन्यातील दुसऱ्याच षटकात मेघना सिंगने पहिला बळी टिपला आहे. मेघनाने सलामीवीर डेनियाल व्याटला (1) सेनेह राणाकरवी झेलबाद केलं.

  • 16 Mar 2022 09:43 AM (IST)

    इंग्लंडच्या डावाला सुरुवात

    इंग्लंडच्या डावाला सुरुवात झाली आहे. सलामीवीर डेनियाल व्याट आणि टॅमी ब्युमॉन्ट क्रीझवर दाखल. भारताची कर्णधार मिताली राजने अनुभवी झुलन गोस्वामीच्या हाती चेंडू सोपवला आहे.

  • 16 Mar 2022 09:26 AM (IST)

    भारताची अखेरची फलंदाज माघारी, 134 धावांवर डाव संपुष्टात

    भारताची अखेरची फलंदाज माघारी परतली आहे. अवघ्या 134 धावांवर भारताचा डाव संपुष्टात आला आहे. कॅरोलेट डीनने मेघना सिंहला (3) त्रिफळाचित केलं.

  • 16 Mar 2022 09:23 AM (IST)

    भारताला 9 वा झटका, झुलन गोस्वामी 20 धावांवर बाद

    भारताने 9 वी विकेट गमावली आहे. केट क्रॉसने झुलन गोस्वामीला 20 धावांवर असताना डेनियाल व्याटकरवी झेलबाद केलं. (भारत 129/9)

  • 16 Mar 2022 08:51 AM (IST)

    भारताला 8 वा धक्का, ऋषा घोष 33 धावांवर बाद

    भारताने 8 वी विकेट गमावली आहे. ऋषा घोष 33 धावांवर असताना धावबाद झाली. नताली सायव्हरने उत्कृष्ट थ्रोवर ऋचाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

  • 16 Mar 2022 08:49 AM (IST)

    झुलनचा षटकार

    झुलन गोस्वामीने 32 व्या षटकात केट क्रॉसला शानदार षटकार लगावला. याच षटकातील चौथ्या चेंडूवर ऋचा घोषने चौकार वसूल केला. दोघींनी या षटकात 12 धावा फटकावल्या.

  • 16 Mar 2022 08:40 AM (IST)

    भारत 100 पार

    सात विकेट गमावल्यानंतर बॅकफुटवर असलेल्या टीम इंडियाचा डाव सावरण्यासाठी यष्टीरक्षक ऋचा घोष आणि अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी पुढे आल्या आहेत. दोघींनी आतापर्यंत 37 धावांची भागीदारी करत भारताचं शतक पूर्ण केलं आहे.

  • 16 Mar 2022 08:18 AM (IST)

    भारताला 7 वा धक्का, पूजा वस्त्राकर बाद

    भारताने 7 वी विकेट गमावली आहे. कॅरोलेट डीनने पूजा वस्त्राकरला पायचित पकडलं. पूजाने 6 धावांचं योगदान दिलं. (भारत 86/7)

  • 16 Mar 2022 08:12 AM (IST)

    भारताच्या उरल्या-सुरल्या आशा संपुष्टात, स्मृती मानधना माघारी

    भारताच्या उरल्या-सुरल्या आशा संपुष्टात आल्या आहेत. एका बाजूने सर्व आघाडीचे फलंदाज बाद होत असताना खेळपट्टीवर नांगर रोवून उभी असलेली स्मृती मानधनादेखील माघारी परतली आहे. सोफी एक्लेस्टन हिने स्मृतीला पायचित पकडलं. स्मृतीने 4 चौकारांसह 58 चेंडूत 35 धावांचं योगदान दिलं. (भारत 71/6)

  • 16 Mar 2022 07:53 AM (IST)

    17 व्या षटकात भारताला दोन धक्के, हरमनप्रीतपाठोपाठ स्नेह राणा बाद

    17 व्या षटकात भारताला दोन धक्के मिळाले. कॅरोलेट डीनने या षटकात हरमनप्रीतपाठोपाठ स्नेह राणाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. षटकातील दुसऱ्या चेंडूवर तिने हरमनप्रीतला (14) एमी जोन्सकरली झेलबाद केलं. तर चौथ्या चेंडूवर तिने स्नेह राणालासुद्धा (0) एमी जोन्सकरली झेलबाद केलं.

  • 16 Mar 2022 07:33 AM (IST)

    हरमनप्रीतचे दोन चौकार, भारताचं अर्धशतक

    अवघ्या 28 धावांत तीन विकेट गमावल्यानंतर भारतीय संघ बॅकफुटवर आहे. धावगती मंदावली असताना हरमनप्रीतने दोन चौकार लगावत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच भारताचं अर्धशतक पूर्ण झालं आहे. हरमनप्रीतने 12 व्या षटकात एक आणि 13 व्या षटकात एक चौकार वसूल केला. (भारत 54/3)

  • 16 Mar 2022 07:18 AM (IST)

    भारताची फलंदाजी विखुरली, तीन फलंदाज स्वस्तात गमावले

    यास्तिका आणि कर्णधार मिताली पाठोपाठ दीप्ती शर्मानेदेखील पॅव्हेलियनची वाट धरली आहे. आठव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दीप्ती धावबाद झाली. नऊ चेंडू डॉट खेळल्यानंतर दीप्तीवर दडपण आले. तिने मिड-ऑफमध्ये एक शॉट खेळला आणि चोरटी धाव घेण्यासाठी ती धावली तथापि, मिड-ऑफमध्ये केट क्रुसने चेंडू अडवला आणि तिला धावबाद करत पॅव्हेलियनमध्ये परतवले.

  • 16 Mar 2022 07:02 AM (IST)

    भारताला दुसरा धक्का, कर्णधार मिताली राज माघारी

    यास्तिका बाद झाल्यावर क्रीझवर आलेली मिताली राजदेखील आल्या पावली माघारी परतली आहे. अन्या श्रबसोले हिने सोफिया डंक्लेकरवी मितालीला झेलबाद केलं. मितालीने 5 चेंडूत एक धाव केली. (भारत 25/2)

  • 16 Mar 2022 07:00 AM (IST)

    भारताला पहिला झटका, यास्तिका भाटिया 8 धावांवर बाद

    स्मृती मानधनाने चौथ्या षटकाची सुरुवात चौकाराने केली. मात्र, अन्या श्रबसोले हिने चौथ्या चेंडूवर यास्तिका भाटियाला त्रिफळाचित करत भारताला पहिला धक्का दिला आणि वनडेत आपले 100 बळी पूर्ण केले. चेंडू थोडा संथ होता, यष्टिका शरीरापासून थोडा दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण चेंडू बॅटच्या कडेला लागून मधल्या स्टंपवर आदळला. यास्तिकाने 11 चेंडूत 8 धावा केल्या

  • 16 Mar 2022 06:52 AM (IST)

    यास्तिकाचा सामन्यातील पहिला चौकार

    पहिल्या षटकात ब्रंटने केवळ तीन धावा दिल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात श्रबसोलेनेही केवळ तीन धावा दिल्या. तिसरे षटक टाकण्याची जबाबदारी पुन्हा ब्रंटकडे सोपवण्यात आली. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर यास्तिकाने तिला मिड-ऑन आणि शॉर्ट मिड-विकेटच्या गॅपमध्ये शानदार चौकार लगावला. या षटकात ब्रंटने सात धावा दिल्या

  • 16 Mar 2022 06:50 AM (IST)

    इंग्लंडने नाणेफेक जिंकली

    इंग्लंडची कर्णधार हेदर नाइटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच भारत प्रथम फलंदाजी करेल