मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील १२ वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारतीय संघाने ७ विकेटने विजय मिळवला आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली भारताच्या शिलदारांनी दमदार खेळ करत पाकिस्तान संघाला चारीमुंड्या चीत केलं. भारताच्या विजयानंतर आजी-माजी खेळाडू ट्विट करत असून भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरची मजा घेतली आहे. आधी शोएबने डिवचलं होतं मात्र भारताने सामना जिंकल्यावर त्याला वीरूने प्रत्युत्तर दिलं.
आमचा पाहुणाचारच वेगळा असून पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना आम्ही बॅटींगची संधी दिली. आम्ही सर्वांची काळजी घेतो. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पाकिस्तान संघाला ऑल आऊट केलं. कदाचित शांततेचे चौकार पाहून पाकिस्तान संघाच्या सर्व खेळाडूंनी लवकरात लवकर तंबूत जाण्याचा निर्णय घेतला असावा, असं वीरेंद्र सेहवाग याने ट्विट करत म्हटलं आहे. शोएबच्या ट्विटची आठवण करून देत वीरूने, ना इश्क में… ना प्यार में… जो मजा 8-0 की हार में, असं टोला मारला.
Shayad khamoshi ke chauke dekhkar Pakistani batsman ne jaldi jaldi pavillion lautne ki thaan li.
Jhel nahi paaye yaar pressure
Haha..Koi nahi Shoaib Bhai.
Na Ishq Na Pyaar mein..
Jo Maza 8-0 ki haar mein ! https://t.co/J5K5fOzmk2— Virender Sehwag (@virendersehwag) October 14, 2023
भारताने हा सामना अगदी सहह जिंकला, कर्णधार रोहित शर्मा याची तुफानी 86 धावांची अर्धशतकी खेळी आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने या सामन्यात 7 विकेटने विजय मिळवला. विराट कोहली 16 धावा, शुबमन गिल 16 धावा करून लवकर आऊट झाले. या दोन विकेटचा तसा काही परिणाम भारताच्या डावावर पडला नाही. कारण कर्णधार रोहित शर्माने पूर्ण सेट अप लावला होता आणि राहिलेलं अधूर काम श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांनी पूर्ण केलं.
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ