मुंबई | 17 नोव्हेंबर 2023 : सध्या सर्वत्र वर्ल्ड कपचा फिवर पाहायला मिळतोय. परवा झालेली इंडियाने न्यूझीलंड सेमी फायनल मॅच तर क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी होती. या मॅचमध्ये विराटच्या नावावर दोन विक्रम लिहिले गेले. तर याचवेळी देशाचं मन जिंकलं ते गोलंदाज मोहम्मद शमीने… न्यूझीलंडला जिंकण्यापासून रोखण्यात शमीची मोठी कामगिरी राहिली. भारतीय क्रिकेट संघात एकाहून एक बॉलर्स आहेत. हे बॉलर्स क्रिकेटचं मैदान ताकदीने गाजवतात. या क्रिकेटपटूंचं पर्सनल लाईफही तितकंच चर्चेत असतं. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह या तिघांनाही अलिशान गाड्यांचा शौक आहे. यांच्या लक्झरी गाड्यांचं कलेक्शन क्रिकेटसह कार प्रेमींना भूरळ पाडतं.
मोहम्मद सिराज यालाही कारचं कलेक्शन करण्याचा छंद आहे. त्याचा रॉयल अंदाज अनेकांना भावतो. सिराजकडे BMW, मर्सिडीज, टोयोटा आणि महिंद्रा थार या कार आहेत. सिराजकडे BMW 5 SERIES SEDAN ही कार आहे. या कारची किंमत 68.90 लाख रुपये इतकी आहे. या कारला रॉयल लुक येण्यासाठी सिराजने तिला मॉडिफाय केलं आहे. त्याला शाही लुक दिलाय. तसंच पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा थारचा फोटोही सिराजने सोशल मीडियावर शेअर केला होता. थारची किंमत 10.98 ते 16.94 लाख रुपयांच्या घरात आहे.
सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये चर्चेत असणारा मोहम्मद शमीही गाड्यांचा शौकिन आहे. शमीकडे Royal Enfield Continental GT 650 ही बाईक आहे. या बाईकची किंमत 3.39 लाख रुपये इतकी आहे. मोहम्मद शमीकडे F-Type Sports जॅग्वार कार देखील आहे. या कारची किंमत 98.13 लाख रुपये इतकी आहे. या कारची किंमत 98.13 लाख रुपयांपासून 1.53 कोटी रुपयांपर्यंत आहे.
Some journeys need no roads, Only willing hearts #mdshami #mdshami11 #jaguar #countryroads #villagelife #myroots pic.twitter.com/InRNAJtpPl
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) January 8, 2023
जसप्रीत बुमराह याच्याकडे लक्झरी गाड्यांचं कलेक्शन आहे. त्याच्याकडे Maruti Dzire या कारसह 2.15 कोटींची Nissan GT-R ही कारही आहे. या शिवाय 13 लाखांची Toyota Etios कारही आहे. तर 93 लाख किमतीची Range Rover Velar ही कारही बुमराहकडे आहे.