हार्दिकसोबत घटस्फोटाची चर्चा असताना नताशा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? इन्स्टा स्टोरीमध्ये नेमकं काय?

| Updated on: Jul 16, 2024 | 10:01 PM

नताशा आणि हार्दिक पांड्या याच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, दोघांनीही यावर काहीच भाष्य केलेलं नाहीये. T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याचे त्याच्या घरी खास स्वागत करण्यात आले. मात्र, यावेळी नताशा ही उपस्थित नव्हती. अशातच नताशाने ठेवलेल्या इन्स्टा स्टोरीची सर्वत्र चर्चा होत आहे.

हार्दिकसोबत घटस्फोटाची चर्चा असताना नताशा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? इन्स्टा स्टोरीमध्ये नेमकं काय?
Follow us on

हार्दिक पांड्याने यंदाच्या T20 वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली. विशेष म्हणजे सर्वांनीच हार्दिक पांड्या याची जोरदार काैतुक केले. हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याची चर्चा आहे. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यातील वाद आहे. फक्त चर्चाच नाहीतर हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने म्हटले की, नताशा ही हार्दिक पांड्यावर प्रचंड नाराज आहे. पुढे नक्की काय होणार हे सांगणे कठीण असल्याचेही त्या व्यक्तीने म्हटलंय. दोघांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू असताना वादामध्ये नताशा सोशल मीडियावर सक्रीय असलेली दिसते.

नताशा दररोज काही ना काही शेअर करताना दिसत आहे. भारताने T-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर अनेकांनी टीमचे अभिनंदन करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या. मात्र, नताशाने एकही पोस्ट शेअर केली नाही. काही दिवसांपूर्वीच नताशाने तिचे जिममधील काही व्हिडीओ शेअर केले. अंबानींच्या लग्नातही हार्दिक पांड्या हा एकटाच दिसला होता. त्यामुळे दोघांमध्ये काही आलबेल नाही हे यावरून स्पष्ट झालं.

घटस्फोटाच्या सतत चर्चा सुरू असतानाच नताशाने इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. इतकंच नाहीतर नताशा ही भारत सोडून चक्क तिचा देश सर्बियाला जात असल्याचे सांगितले जातंय. एका फोटोमध्ये बॅग दिसत आहे. हा फोटो शेअर करत नताशाने खास कॅप्शन आणि काही इमोजीही शेअर केले आहेत.

नताशा हिने लिहिले की, ‘ही वर्षातील ती वाली वेळ आहे’ यासोबत तिने डोळ्यांमध्ये अश्रू, विमान, हर्ट आणि घराचा इमोजी शेअर केलाय. नताशा हिने अजून एक फोटो शेअर केलाय. हा फोटो तिने गाडीमधील शेअर केल्याचे दिसत आहे. यामध्ये कुत्र्याचे एक छोटे पिल्लू देखील फोटोमध्ये दिसत आहे. या फोटोनंतर नताशा ही भारत सोडून जात असल्याची चर्चा आहे.