Rishabh Pant Accident : टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतचा (Risbah Pant) शुक्रवारी अपघात झाला. पंतची तब्येत स्थिर आहे. मात्र त्याला बऱ्याच ठिकाणी दुखापत झाली आहे. या अपघातामुळे पंतला क्रिकेटपासून अनेक महिने लांब रहावं लागणार आहे. पंतच्या अपघाताचं नक्की कारण अखेर समोर आलं आहे. पंतच्या अपघाताबाबत अनेक दावे करण्यात येत आहेत. मात्र अपघाताबाबत उत्तराखंड पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. (indian cricketer rishabh pant healath update uttrakhand police given reason of accident know details)
पंत फार वेगाने गाडी चालवत असल्याने हा अपघात झाल्याचा दावा हा विविध मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. तर काहींचं असंही म्हणंन आहे की पंत ड्रिंक ड्राईव्ह करत होता, त्यामुळे हा अपघात झाला. मात्र उत्तराखंड पोलिसांनी हा दावा खोडून काढलाय.
“आम्ही नरसान बॉर्डरवर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे 9 ते 10 वेळा चेक केले. पंतची गाडी ओव्हरस्पीड नव्हती. राष्ट्रीय महामार्गावर वेगमर्यादा ही 80 किमी प्रति तास इतकी असते. सीसीटीव्ही फुटेज पाहून वाटेल की गाडी भरधाव वेगात आहे. मात्र असं यामुळे वाटतंय कारण गाडी डिव्हायडरला धडकली. आमच्या तांत्रिक विभागाने अपघातस्थळाचा पंचनामा केला. मात्र आम्हाला असा काही पुरावा मिळाला नाही की ज्यामुळे हे सिद्ध होईल की पंत भरधाव वेगात गाडी चालवत होता”, अशी माहिती उत्तराखंड पोलिसांनी दिली. तर पंतचा अपघात हा डुलकी लागल्याने झाला, असं उत्तराखंड पोलीस डीजीपी अशोक कुमार यांनी स्पष्ट केलं.
“तसेच पंत नशेत नव्हता असंही उत्तराखंड पोलिसांनी नमूद केलं. पंत जर नशेत असता तर तो दिल्लीवरुन 200 किमी स्पीडने गाडीला अपघाता कसा नसता झाला. पंत अपघातानंतर स्वत: गाडीबाहेर आला, जर तो नशेत असता तर त्याला तसं शक्य नसतं झालं. पंतवर अपघातानंतर स्थानिक रुग्णालयात प्रथमोपचार देण्यात आले, तो ठीक होता” , असंही उत्तराखंड पोलिसांनी सांगितलं.
“गाडी फार वेगात होती त्यामुळे डिव्हायडरला धडकली. मात्र या अपघातात कुणालाच काही दुखापत झाली नाही. यामुळे कोणतीच कारवाई करण्यात आली नाही”, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.