क्रिकेटर Musheer Khan याचा भीषण अपघात, नक्की काय झालं?

| Updated on: Sep 28, 2024 | 12:09 PM

Musheer Khan Accident: मुशीर खान याची मुंबई संघात इराणी ट्रॉफीसाठी निवड झाली आहे. त्याआधी मुशीर खान याचा गंभीर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घ्या नक्की काय झालंय?

क्रिकेटर Musheer Khan याचा भीषण अपघात, नक्की काय झालं?
sarfaraz khan and musheer khan
Image Credit source: PTI
Follow us on

भारतीय क्रिकेट वर्तुळातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेटर सरफराज खान याचा भाऊ मुशीर खान याचा रस्ते अपघात झाल्याच माहिती समोर आली आहे. या अपघातात मुशीर खान याच्या मानेला फ्रॅक्चर झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे मुशीर खान ईराणी कप सामन्याला मुकावं लागण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुशीर खान आणि त्याचे कोच वडील नौशाद खान हे कानपूरवरुन लखनऊला जात होते. या दरम्यान अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. रिपोट्सनुसार, मुशीर या सामन्यासाठी वडिलांसह लखनऊला जात होता. तेव्हा हा अपघात झाला. मुशीर खानची ईराणी ट्रॉफीसाठी मुंबईकडून निवड झाली आहे. ईराणी ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन हे 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान लखनऊमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

मुशीर खान मुंबईचा स्टार खेळाडू आहे. मुशीरने अंडर 19 टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. टीओआयच्या वृत्तानुसार, मुशीर ईराणी कपसाठी मुंबई टीमसह लखनऊला गेला नाही. मुशीर वडिलांसह गावी आजमगढ येथे होता. मुशीर आणि त्याचे वडील नौशाद खान हे दोघे आजमगढ येथून लखनऊला जात होते. तेव्हा हा अपघात झाला आहे. मुशीरची तब्येत आता कशी आहे? याबाबत माहिती नाही. मात्र या अपघातानंतर मुशीरला ईराणी ट्रॉफीला मुकावं लागणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. इतकंच नाही, तर मुशीरला 11 ऑक्टोबरपासून होणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेलाही मुकावं लागू शकतं.

दरम्यान मुशीर खानच्या अपघाताबाबत एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनने कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच मुशीरला अपघातात काय काय झालंय? याबाबत सविस्तर माहिती येणं अपेक्षित आहेत. मुशीरला फार काही झालेलं नसावं. तसेच मुशीर यातून लवकरात लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना क्रिकेट चाहत्यांकडून करण्यात येत आहे.

मुशीर खानचा अपघात

मुशीर खानची कारकीर्द

मुशीर खानने आतापर्यंत 9 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 51,14 च्या सरासरीने 716 धावा केल्या आहेत. मुशीरने या दरम्यान 3 शतकं आणि 1 अर्धशतक केलं आहे. तसेच मुशीरने बॉलिंगनेही योगदान दिलं आहे. मुशीरने आतापर्यंत 8 फर्स्ट क्लास विकेट्स घेतल्या आहेत.