मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या कर्णधारपदावरून अनेक दिग्गजांनी त्याच्यावर निशाणा साधलाय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यामध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. माजी कर्णधार विराट कोहली याला आयसीसी ट्रॉफी जिंकता आल्या नाहीत. त्यानंतर रोहित शर्माकडे नेतृत्त्व सोपवण्यात आलं होतं. मात्र त्यालाही आपल्या नेतृत्त्वामध्ये विशेष छाप पाडता आली नाही. आता येत्या आशिया कपध्ये रोहितला मोठी संधी असून टीम इंडियाला आयसीसीची ट्रॉफी मिळवून देण्याची संधी आहे. रोहितच्या नेतृत्त्वामध्ये काही खेळाडूंचं करिअर संपल्यात जमा झालं आहे.
रोहित शर्मा याच्याकडे नेतृत्त्व गेल्यावर स्टार खेळाडू युजवेंद्र चहल याला संघात स्थान मिळालं नाही. टीम इंडियाचा मुख्य फिरकीपटू असलेल्या चहलला नंतर संघात काही स्थान मिळालं नाही. विराट कोहली याचा हुकमी एक्का असलेल्या चहलला टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये त्याचा स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला नव्हता. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धवनने चहलला त्याच्या नेतृत्वाखाली संधी दिली, ज्यामध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. 32 वर्षांचा असलेल्या चहलने आतापर्यंत 72 वनडे आणि 75 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. चहलने आातापर्यंत कसोटीमध्ये पदार्पण केलेलं नाही.
युजवेंद्र चहल याच्यानंतर दुसरा खेळाडू म्हणजे रवी बिष्णोई आहे. रवीला फरा काही संधी मिळाली नाही, ज्या-ज्या वेळी त्याल्या संधी मिळाली तेव्हा त्याने सिद्ध करून दाखवलं आहे. आशिया कपमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला रवीने आऊट केलं होतं. एकंदरित त्याला येत्या काही दिवसांमध्ये संधी मिळाली नाहीतर हा खेळाडू क्रिकेटपासून दूर जावू शकतो.
मुंबई इंडिअन्सचा हुमकी एक्का असलेला झारखंडचा खेळाडू ईशान किशन आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या पॉवर हिंटिंगच्या जोरावर त्याने अनेकवेळा मुंबईला चांगली सुरूवात करून दिली आहे. ईशानची वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या फायनल सामन्यासाठी निवड झाली होती. मात्र रोहित शर्मा याने त्याला संधी न देता के एस भरत याला संधी दिली होती. वर्ल्ड कप 2023 मध्ये त्याला संघात स्थान मिळतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.