मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देव टीम इंडियामधील खेळाडूंबाबत बोलताना ते अहंकारी असल्याची टीका केली होती. काही खेळाडू पैशाच्या बाबतीत अहंकारी झाले असल्याचंही कपिल देव म्हणाले होते. टीम इंडियामधील खेळाडू हे सीनिअर खेळाडूंकडे सल्ला घ्यायला जात नाहीत, त्यांना असं वाटू लागलं आहे की आपल्याला सर्व काही माहिती आहे. कपिल देव यांच्या या टीकेनंतर टीम इंडियाचा स्टार खेळा्डू रविंद्र जडेजाने प्रत्युत्तर दिलं आहे.
जेव्हा टीम इंडियाचा पराभव होतो त्यावेळी अशा प्रकारची टीका केली जाते. संघातील प्रत्येक खेळाडू फक्त जिंकण्यासाठी खेळतो आणि त्यावरच फोकस करत असतो. कोणालाही कसला अहंकार नाही ना इगो नाही. कोणताही खेळाडू स्वत: चा अजेंडा चालवत नाही. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण मला वाटत नाही की कोणत्याही खेळाडूमध्य अहंकार आहे. प्रत्येटकजण आपल्या खेळाचा आनंद घेत असून सरावावरही मेहनत घेत आहे. प्रत्येक खेळाडूचा संघासह देशासाठी काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न असल्याचंही जडेजाने सांगितलं.
आताच्या क्रिकेटपटूंना वाटत आहे की त्यांना सर्व गोष्टी माहित आहेत. अनेक खेळाडू असे आहेत की ज्यांना मदतीची गरज आहे. तुमच्याजवळ सुनील गावसकर आहेत त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता? पण काही खेळाडूंना अहंकार आहे की आपण म्हणजे सर्वोत्कृष्ट आहोत आणि आपल्याला सर्व गोष्टी माहित आहेत, असं कपिल देव यांनी सांगितलं.
दरम्यान, कपिल देव यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. यावेळी बोलतान कपिल देव यांनी जसप्रीत बुमराह आणि आयपीएलबाबतही भाष्य केलेलं. बुमराहला वेळ देऊन जर तो फायनल आणि सेमी फायनलसाठी उपलब्ध होणार नसेल तर त्याच्यावर वेळ बर्बाद केल्यासारखं असल्याचंही कपिल देव म्हणाले होते.