मुंबई : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यातही ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने 50 ओव्हरमध्ये 258-8 धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाला या धावांचा पाठलाग करण्यात अपयश आलं. टीम इंडियाला 50 ओव्हरमध्ये 255-8 धावा करता आल्या. टीम इंडियाची विकेटकीपर रिचा घोष हिची 96 धावांची जिगरबाज खेळी व्यर्थ गेली. अटीतटीच्या लढतीमध्ये टीम इंडियाचा 3 धावांनी पराभव झाला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलिया संघाने तीन सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात घातली आहे.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाकडून सलामीला यास्तिका भाटिया आणि स्मृती मानधना उतरले होते. दोघांनी सावध सुरूवात केली होती मात्र ही भागीदारी किम गर्थ हिने तोडली. यास्तिका भाटिया हिला 14 धावांवर माघारी पाठवलं. रिचा घोष आणि मानधना यांनी मजबूत भागीदारी केली मात्र मानधना 34 धावांवर आऊट झाली. तिने ३ चौकार आणि एक षटकार मारला होता. मानधना गेल्यावर रिचा आणि जेमिमा यांनीही चांगली भागीदारी रचली होती. जेमिमाही से झाली होती, रिचा आणि तिने स्कोरबोर्ड धावता ठेवला होता. वैयक्तिक 44 धावांवर खेळणारी जेमिमा मोठा फटका खेळण्याच्य नादात कॅच आऊट झाली. सामन्याचा हाच मोठा टर्निंग पॉईंट ठरला.
जेमिमाह आऊट झाल्यावर हरमनप्रीत कौर 5 धावा, पुजा वस्त्राकर 8 धावा, हर्लीन देओल 1 धाव काढून आऊट झाले. रिचा घोष एकटी एक बाजू लढवत होती मात्र तिला साथ मिळाली नाही. 96 धावांवर रिचा आऊट झाली त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली. रिचाने आपल्या 96 धावांच्या खेळीमध्ये 13 चौकार मारले. ऑस्ट्रेलियाकडून अॅनाबेल सदरलँडन हिने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियाक फोबी लिचफिल्डने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. त्यानंतर एलिस पेरीने 50 धावांची खेळी केली. तर टीम इंडियाकडून स्पिनर दीप्ती शर्मा हिने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (C), दीप्ती शर्मा, रिचा घोष (डब्ल्यू), स्नेह राणा, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): अॅलिसा हिली (W/C), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अॅशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहम, अलाना किंग, किम गर्थ, डार्सी ब्राउन