INDW vs ENGW T20 : नाणेफेकीचा कौल जिंकत इंग्लंडने घेतला गोलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये केला असा बदल

| Updated on: Dec 09, 2023 | 6:48 PM

भारत आणि इंग्लंड वुमन्स संघात टी20 मालिकेचा दुसरा सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत इंग्लंडने गोलंदाजी स्वीकारली आहे. त्यानंतर हरमनप्रीत कौर हीनेही आम्हाला गोलंदाजी करायची होतं असं सांगितलं आहे. त्यामुळे नाणेफेक हरल्याने टीम इंडियाच्या गोटात निराशा असणार आहे. हा सामना काहीही करून भारताला जिंकावाच लागणार आहे. अन्यथा मालिका गमवावी लागणार आहे.

INDW vs ENGW T20 : नाणेफेकीचा कौल जिंकत इंग्लंडने घेतला गोलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये केला असा बदल
INDW vs ENGW T20 : दुसऱ्या सामन्यात कौल इंग्लंडच्या बाजूने, गोलंदाजी घेत प्लेइंग इलेव्हनमध्ये या खेळाडूची एन्ट्री
Follow us on

मुंबई : भारत आणि इंग्लंड महिला संघात तीन सामन्याची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकून 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. अन्यथा तिसरा सामना होण्यापूर्वीच इंग्लंड ही मालिका खिशात घालेल. दरम्यान इंग्लंडची कर्णधार हेथर नाईट हीने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. “आम्ही धावांचा पाठलाग करणं पसंत करू. आमच्याकडे चांगले बॅटर्स आहेत. मालिकेत आघाडी घेतल्याने चांगलं वाटत आहे. आम्ही गोलंदाजीत एक बदल केला आहे महिका गौरऐवजी संघात चार्ली डीनला संघात घेतलं आहे.” असं इंग्लंडची कर्णधार हेथर नाईट हीने सांगितलं.

दुसरीकडे नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर हरमनप्रीत कौर नाराज दिसली. “आम्हीही गोलंदाजी करण्याचा विचार करत होतो. पण प्रत्येकवेळी कौल आपल्या बाजूने लागेल असं नाही. मागच्या सामन्यात दव पडलं नव्हतं. त्यामुळे आम्ही पहिली फलंदाजी करण्यास सकारात्मक आहोत. मागच्या चुकांमधून आम्ही फील्ड प्लेसमेंट आणि आम्हाला अधिक चांगल्या गोलंदाजीची आवश्यकता असलेली क्षेत्रे काय आहेत ते समजून घेतलं. कनिका आहुजा ऐवजी संघात तीतास साधूला घेतलं आहे.”, असं कर्णधार हरमनप्रीत कौर हीने सांगितलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, पूजा वस्त्राकर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक

इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सोफिया डंकले, डॅनिएल व्याट, अॅलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, हेथर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (विकेटकीपर), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल