मुंबई : भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये कसोटी सामना सुरु असून पहिल्या दिवसाचा खेळ संपला. पहिल्या दिवसाच्या खेळावर भारताची मजबूत पकड दिसून आली. भारताने ७ गडी गमवून ४१० धावा केल्या. आघाडीचे बॅटर्स अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीच्या बॅटर्संनी डाव सावरला. तसेच संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. जेमिमा रॉड्रिग्स, शुभा सतीश, हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांनी जबरदस्त खेळी केली. जेमिमा, शुभा, यास्तिका आणि दीप्ती यांनी अर्धशतकी खेळी केली. पण कर्णधार हरमनप्रीत कौर हीचं अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकलं. धावचीत होत ती तंबूत परतली. पण ती ज्या पद्धतीने बाद झाली त्याला दुर्दैव म्हणण्याची वेळ क्रीडाप्रेमींवर आली आहे.
टीम इंडियाचे चार जणी बाद झाल्यानंतर यास्तिका भाटिया आणि हरमनप्रीत कौर ही जोडी मैदानात होती. दोघांची चांगली भागीदारी जमली होती. पण दुर्दैवाने हरमनप्रीत कौरला बाद होत तंबूत परतावं लागलं. हरमनप्रीत कौरने ८१ चेंडूत ४९ धावा केल्या होत्या. हरमनप्रीत कौर स्ट्राईकला होती आणि चार्ली डीनला गोलंदाजी सोपवली होती. पहिल्याच चेंडूवर तिने व्याट उभी असलेल्या पॉइंट्सच्या दिशेने बॉल मारला. सहज एक धाव घेता येईल असं वाटत होतं. पण यास्तिकाने दिला पुन्हा परत पाठवलं आणि नको तीच चूक झाली.
And again Harmanpreet Kaur gets out similar fashion…#HarmanpreetKaur #INDvENG pic.twitter.com/lX4QZLnYAl
— Ajay Ahire (@Ajayahire_cric) December 14, 2023
हरमनप्रीत कौरला मागे परतण्यास बराच वेळ होता. पण क्रिसमध्ये पोहोण्यापूर्वीच बॅट अडकली आणि अडखळली. तितक्यात व्याटने फेकलेला बॉल थेट स्टंपला लागला आणि जोरदार अपील करण्यात आली. यावेळी तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी. कॅमेऱ्यात पाहिल्यानंतर हरमनप्रीत कौर बाद असल्याचं निष्पन्न झालं. हरमनप्रीत अशा पद्धतीने दुसऱ्यांदा बाद झाली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशीच बाद झाली होती.
Unfortunate run-out for Harmanpreet Kaur 🙄
Looks like her bat got stuck on the pitch (again) 😑#CricketTwitter #INDvENG pic.twitter.com/9SSMavS9f4
— Female Cricket (@imfemalecricket) December 14, 2023
भारत: स्मृति मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ति शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), स्नेह राणा, शुभा सतीश, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकुर सिंह, राजेश्वरी गायकवाड
इंग्लंड: टॅमी ब्यूमोंट, सोफिया डंकले, हीथर नाइट (कर्णधार), नेट सायवर-ब्रंट, डेनिएल व्याट, एमी जोन्स (विकेटकीपर), सोफी एक्लेस्टोन, चार्लोट डीन, केट क्रॉस, लॉरेन फाइलर, लॉरेन बेल