भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज आणि कर्णधार स्मृती मानधना हीचा तडाखा सुरुच आहे. स्मृतीने राजकोटमध्ये आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात विस्फोटक शतक ठोकलं आहे. स्मृतीने अवघ्या 70 चेंडूंमध्ये हे शतक पूर्ण केलं. स्मृतीने यासह महिला क्रिकेटमध्ये कीर्तीमान केलाय. स्मृती टीम इंडियाकडून वेगवान शतक करणारी पहिली महिला फलंदाज ठरली आहे. स्मृतीने यासह नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हीचा वेगवान शतकाचा विक्रम मोडीत काढला आहे. हरमनप्रीत हीने 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 87 चेंडूत शतक केलं होतं.
स्मृतीच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 10 वं शतक ठरलं. स्मृती अशी कामगिरी करणारी पहिली महिला भारतीय ठरली. इतकंच नाही, तर स्मृती 10 किंवा त्यापेक्षा अधिक एकदिवसीय शतकं करणारी एकूण चौथी महिला फलंदाज ठरली आहे.
मेग लँनिंग : 15
सूजी बेट्स : 13
टॅमी ब्यूमोन्ट : 10
स्मृती मानधना : 10
स्मृतीचा शतकी झंझावात
The Fastest ODI century ever for India in women’s cricket ⚡️⚡️
A milestone-filled knock from Captain Smriti Mandhana 👏👏
Updates ▶️ https://t.co/xOe6thhPiL#TeamIndia | #INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/L9hj2SANJU
— BCCI Women (@BCCIWomen) January 15, 2025
टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर
दरम्यान टीम इंडियाने ही मालिका आधीच जिंकली आहे. टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे तिसरा सामना जिंकून आयर्लंडला 3-0 क्लिन स्वीप करण्याची संधी आहे. टीम इंडिया 50 षटकांमध्ये आयर्लंडसमोर किती धावांचं आव्हान ठेवते? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
वूमन्स इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मानधना (कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, सायली सातघरे, मिन्नू मणी, तनुजा कंवर आणि तितस साधू.
वूमन्स आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन : सारा फोर्ब्स, गॅबी लुईस (कर्णधार), कुल्टर रेली (विकेटकीपर), ओर्ला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलानी, लीह पॉल, अर्लीन केली, अवा कॅनिंग, जॉर्जिना डेम्पसी, फ्रेया सार्जेंट आणि अलाना डालझेल.