IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी संघ जाहीर, जाणून घ्या स्पर्धेची संपूर्ण माहिती

| Updated on: May 31, 2024 | 8:55 PM

भारत दक्षिण आफ्रिका वुमन्स मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. जवळपास 10 वर्षानंतर या मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. 16 ते 9 जुलै दरम्यान ही मालिका पार पडणार आहे. यात एक कसोटी, तीन वनडे आणि 3 टी20 सामने होणार आहेत.

IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी संघ जाहीर, जाणून घ्या स्पर्धेची संपूर्ण माहिती
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यात भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे.भारतीय महिला संघ जवळपास दशकभरानंतर दक्षिण आफ्रिकेत जाणार आहे. 16 जून ते 9 जुलै दरम्यान दोन्ही संघांमधील मालिका होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी20 मालिका होणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय सघांची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेनेही वनडे आणि कसोटी संघ जाहीर केला आहे. टी20 संघाची घोषणा अद्याप झालेली नाही.या मालिकेत हरमनप्रीत कौर कर्णधार, तर स्मृती मंधाना ही उपकर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी जुलैमध्ये बांगलादेशविरुद्ध अखेरचा वनडे खेळणाऱ्या प्रिया पुनियाला संघात संधी देण्यात आली आहे. प्रियाची वनडे आणि कसोटी संघात निवड झाली आहे.

भारतीय महिला संघ

एकदिवसीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), दयालन हेमलता, राधा यादव, आशा शोभना, सारिका पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, प्रिया पुनिया.

कसोटी संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, शुभा सतीश, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, सायका इशाक, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, प्रिया पुनिया.

टी20 संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दयालन हेमलता, उमा छेत्री (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमा रॉड्रिग्ज, सजना सजिवन, दीप्ती शर्मा, रंका पाटील, ए. आशा शोभना, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह ठाकूर, अरुंधती रेड्डी.

दक्षिण आफ्रिकेचा संघ

एकदिवसीय संघ: लॉरा वोहलवर्ड (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लार्क, ॲनेरी डेर्कसेन, माइक डी रिडर, सिनालो जाफ्ता, मारिजाने केप, अयाबोंगा झाका, मसाबता क्लास, सुने ल्यूस, एलिस-मेरी मार्जे, नॉनकोलुक्लुओन, नॉनोक्युले, माइक डी. मलाबा, शांगासे, डेल्मी टकर.

कसोटी संघ: लॉरा वोहलवर्ड (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नदिन डी क्लार्क, ॲनेरी डेर्कसेन, माइक डी रिडर, सिनालो जाफ्ता, मारिजाने केप, मसाबता क्लॉस, सुने लुस, एलिस-मेरी मार्जे, नॉनकुलुलेको म्लाबाक, नॉनकुलुलेको म्लाबाक, नॉन्कुलेको , डेल्मी टकर.