टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात एका बाजूला आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीसाठी तयारी करतेय. तर दुसऱ्या बाजूला महिला दक्षिण आफ्रिका क्रिेकट संघ भारत दौऱ्यावर आहे. वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आज 16 जूनपासून सुरुवात झालीय. या मालिकेतील सलामीच्या सामन्यात टीम इंडियाची उपकर्णधार सांगलीकर स्मृती मंधाना हीने निर्णायक क्षणी शानदार शतक ठोकलं आहे. स्मृतीने या शतकासह टीम इंडियाचा डाव सावरला. टीम इंडिया अडचणीत असताना स्मृतीने ही खेळी केली.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलंय. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्याने 5 बाद 99 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा या दोघींनी सार्थपणे टीम इंडियाचा डाव साववला. दोघींनी सहाव्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दीप्ती शर्मा 48 बॉलमध्ये 37 धावावंर आऊट झाली. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 6 बाद 180 अशी झाली.
दीप्तीनंतर पूजा वस्त्राकर मैदानात आली. टीम इंडियाने 200 पार मजल मारली. त्यानंतर स्मृतीने आपल्या वनडे क्रिकेट कारकीर्दीतील सहावं शतक ठोकलं. स्मृतीने 86.21 च्या स्ट्राईक रेटने 116 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. स्मृतीने या खेळीत 10 चौकार आणि 1 सिक्स ठोकला.
दक्षिण आफ्रिके विरुद्ध स्मृतीची शानदार खेळी
💯 for Smriti Mandhana! 👏 👏
What a fantastic knock this has been from the #TeamIndia vice-captain! 🙌 🙌
Her 6⃣th ODI ton! 👍 👍
Follow The Match ▶️ https://t.co/EbYe44lVao #TeamIndia | #INDvSA | @mandhana_smriti | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/xZlfgNaK9I
— BCCI Women (@BCCIWomen) June 16, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, ॲनेरी डेर्कसेन, नॉन्डुमिसो शांगासे, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), मसाबता क्लास, नॉनकुलुलेको मलाबा आणि अयाबोंगा खाका.