भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण अफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका 3-0 ने खिशात घातली. आता भारताचा एकमेव कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारतीय फलंदाजांनी दक्षिण अफ्रिकन गोलंदाजांची पिसं काढली. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी शतकी खेळी केली. दोघांच्या शतकी खेळीमुळे भारताची धावसंक्या 350 पार गेली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेवर हावी झाला आहे. शफाली वर्माने 113 चेंडूत आपले शतक, स्मृती मंधानाने 122 चेंडूत शानदार शतक झळकावले. यावेळी शफाली वर्माच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे. शफाली वर्माने 40 वर्षे जुना विश्वविक्रम मोडीत काढला आहे.
महिला क्रिकेट संघात यापूर्वी इंग्लंडच्या जेनेट ब्रिटनच्या नावावर विक्रम होता. तिने 1984 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना 137 चेंडूत शतक ठोकलं होतं. आता विक्रम शफाली वर्माच्या नावावर झाला आहे. तिने फक्त 113 चेंडूत शतक झळकावलं आहे. शफाली या खेळीने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारी क्रिकेटपटू ठरली आहे. इतकंच काय तर शफाली वर्माने 150 धावांचा पल्लाही ओलांडला असून द्विशतकाच्या उंबरठ्यावर आहे.
That maiden international century feeling 💯🤗
Follow the match ▶️ https://t.co/4EU1Kp7wJe#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank | @TheShafaliVerma pic.twitter.com/yynZnKlt8N
— BCCI Women (@BCCIWomen) June 28, 2024
दुसरीकडे, स्मृती मंधानाचा दीड शतक फक्त एका धावाने हुकलं. तिने 161 चेंडूंचा सामना करत 27 चौकार आणि 1 षटकार मारत 149 धावा केल्या. डेलमी टकरच्या गोलंदाजीवर फटका चुकला आणि अॅनेरी डेर्कसेनच्या हाती झेल गेला.
दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), स्युने लुस, ॲनेके बॉश, मारिझान कॅप, डेल्मी टकर, नदिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), मसाबता क्लास, नॉनकुलुलेको म्लाबा, तुमी सेखुखुने.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, शुभा सतीश, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रेणुका ठाकूर सिंग, राजेश्वरी गायकवाड