भारत आणि वेस्ट इंडिज महिला संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा वनडे सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. भारताला मालिका विजयासाठी, तर वेस्ट इंडिजला मालिका वाचवण्यासाठी हा सामना महत्वाचा ठरतो. भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात सर्वांच लक्ष हे स्मृती मंधानाच्या कामगिरीकडे लागून होतं. स्मृती मंधानाने सलग चार सामन्यात अर्धशतकी खेळी आहे. तीन टी20 आणि एका वनडे सामन्यात शतकं ठोकलं होतं. पहिल्या वनडे सामन्यात तिचं शतक अवघ्या 9 धावांनी हुकलं होतं. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात स्मृती मंधाना हा फॉर्म कायम ठेवणार का? असा प्रश्र क्रीडाप्रेमींना पडला होता. स्मृतीचा सध्या गोल्डन टाईम सुरु असून सलग पाचव्या सामन्यात अर्धशतक ठोकलं आहे. स्मृती मंधानाने 47 चेंडूत 53 धावांची खेळी केली. यात 7 चौकार आणि 2 षटकार मारले. धावचीत झाली नसती तर कदाचित आज शतकी खेळीही केली असती.
स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी दुसर्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल ही तिसरी जोडी असून त्यांनी भारतासाठी शतकी भागीदारी केली आहे. दुसरीकडे, प्रतिका रावलने 86 चेंडूत 76 धावांची खेळी केली. तिने 10 चौकार आणि 1 षटकार मारला. भारताची सध्याची धावगती पाहता भारतीय संघ आरामात 250 च्या पार धावसंख्या करू शकतो अशी स्थिती आहे. आता मधल्या फळीतील फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना, प्रतिका रावल, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सायमा ठाकोर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग, प्रिया मिश्रा.
वेस्ट इंडीज महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, रशादा विल्यम्स, डिआंड्रा डॉटिन, नेरिसा क्राफ्टन, शेमेन कॅम्पबेल (विकेटकीपर), आलिया ॲलेने, झैदा जेम्स, करिश्मा रामहारक, शमिलिया कोनेल, ॲफी फ्लेचर