मुंबई | भारतात 12 वर्षानंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघांमध्ये देशातील 10 शहरांमध्ये क्रिकेटचा थरार रंगत आहे. क्रिकेट चाहते मोठ्या उत्साहात स्टेडियममध्ये सामने पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑलिम्पिकमध्ये आता क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल 128 वर्षानंतर क्रिेकेटची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री झाली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने हा मोठा निर्णय घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची शुक्रवारी मुंबईत बैठक पार पडली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार झाली. या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता 2028 पासून ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे. लॉस एंजेलिसमध्ये 2028 साली ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं आहे.
“लॉस एंजेलिस समितीने 5 खेळांचा प्रस्ताव ठेवला. या 5 खेळांचा ऑलिम्पिकमध्ये समावेळ केला जाऊ शकतो. यात क्रिकेटचाही समावेश आहे. कार्यकारी मंडळ याबाबत बैठकीत चर्चा करेल”, असं आयओसीचे क्रीडा संचालक किट मॅककोनेल यांनी म्हटलं. लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक आयोजकांनी 128 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर क्रिकेटचा समावेश करण्याची मागणी केली. याआधी 1900 साली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट सामने खेळवण्यात आले होते.
क्रिकेटसह या 5 खेळांचा समावेश
🚨 #LA28 proposes 5⃣ new sports for the 2028 Olympic Sports Program –
⚾️Baseball/🥎Softball
🏏Cricket
🏈Flag Football
🥍Lacrosse
⚫️SquashOfficial Statement: https://t.co/t6Yb06fVKs pic.twitter.com/P5qYhbolfY
— LA28 (@LA28) October 9, 2023
क्रिकेटसह फ्लॅग फुटबॉल, बेसबॉल/सॉफ्टबॉल, लेक्रोस आणि स्क्वॅश या खेळांचाही 2028 ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्यात आलं आहे.
दरम्यान 24 वर्षानंतर इंग्लंडमधील बर्मिंगघम इथे 22 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये वूमन्स क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. क्रिकेटला 24 वर्षांनी कॉमनवेल्थमध्ये स्थान देण्यात आलं. त्याआधी 1998 मध्ये मेन्स क्रिकेटला संधी दिली होती. बर्मिंगघम इथे झालेल्या या 22 व्या कॉमनवेल्थ स्पर्धेत ऑस्ट्रेलिया टीमने सुवर्पण पदक जिंकत इतिहास रचला होता. तर टीम इंडियाने रौप्य पदक पटकावलं होतं.