मुंबई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल IPL-14 सुरु होण्यास आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. 9 एप्रिलपासून आयपीएल 14 चं बिगुल वाजणार आहे. टी 20 क्रिकेटमध्ये (T20 Cricket) चौकार-षटकारांची आतषबाजी सुरु होईल. आयपीएल किंवा टी 20 सामने गाजवणारे खेळाडू म्हटलं की ख्रिस गेल, विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma), ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांची नावं समोर येतात. मात्र टी 20 च्या इतिहासात सर्वात धोकादायक खेळाडूंच्या यादीत एक नाव आहे, ते म्हणजे आंद्रे रसेल (Andre Russell). कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाकडून खेळणारा आंद्रे रसेलचा (IPL Andre Russel) जर हात बसला, तर गेल असो की डिव्हिलियर्स, रसेलसमोर सर्वजण फिके पडतात. (IPL 14 the player who change the game Kolkata Knight Riders attacking batsman andre russell)
आंद्रे रसेलमध्ये सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. जागेवर उभं राहून चेंडू ग्राऊंडच्या पलिकडे पाडण्याची ताकद रसेलमध्ये आहे. वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलने जगभरात टी 20 आणि टी 10 लीगमध्ये वादळ निर्माण केलं आहे.
असं असलं तरी आंद्रे रसेल आयपीएलच्या मागील हंगामात पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सला मोठी कामगिरी करता आली नाही. खराब फिटनेसमुळेही रसेल मोठ्या खेळी खेळू शकला नाही. संयुक्त अरब अमिरात अर्थाय UAE मध्ये आयपीएलचा 13 वा हंगाम खेळवण्यात आला. त्यावेळी रसेल 10 सामने खेळला. मात्र केवळ 13 च्या सरासरीने त्याला केवळ 117 धावाच करता आल्या. सध्या इयॉन मॉर्गन कोलकाता नाईट रायडर्सचं कर्णधारपद भूषवत आहे. जर नाईट रायडर्सना तिसऱ्यांदा आयपीएल चषक जिंकायचा असेल तर आंद्रे रसेल तळपणं आवश्यक आहे.
आंद्रे रसेल हा असा खेळाडू आहे, जो चौकार कमी मारतो आणि षटकार जास्त ठोकतो. रसेल हा 2017 सोडलं तर 2012 पासून सलग आयपीएलमध्ये खेळत आहे. आतापर्यंत त्याने एकूण 74 आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 29.74 च्या सरासरीने 1517 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 8 अर्धशतकं झळकावली आहेतच, शिवाय 10 वेळा तो नाबाद राहिला आहे. महत्त्वाचं म्हणजे 74 सामन्यात रसेलने 105 चौकार ठोकले आहेत, तर तब्बल 129 षटकार खेचले आहेत.
आयपीएलच्या 2019 चा हंगाम रसेलसाठी दमदार होता. 2019 मध्ये 14 सामन्यांत त्याने 510 धावा ठोकल्या. 4 सामन्यात तो नाबाद राहिला. त्यावेळी त्याची सरासरी 56.66 इतकी होती. नाबाद 80 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. त्या सीजनमध्ये 31 चौकार आणि 52 षटकार ठोकले होते.
संबंधित बातम्या
‘तुझा आवडता क्रिकेटर कोण?’, रिषभची मैत्रीण इशा नेगीचं ‘स्ट्रेट फॉरवर्ड’ उत्तर, चाहते म्हणाले….
IPL 2021 : ‘बापसे बेटी सवाई!’, बटलरच्या लेकीचा हृदयस्पर्शी Video
(IPL 14 the player who change the game Kolkata Knight Riders attacking batsman andre russell)