मुंबई : इंग्लंडविरुद्ध कसोटी, टी ट्वेन्टी आणि एकदिवसीय मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडू थेट पुण्यातूनच आयपीएलच्या कॅम्पसाठी (IPL 2021) रवाना होत आहेत. या हंगामातील सलामीचा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (Royals Challengers Banglore) यांच्यात चेन्नईत पार पडणार आहे. त्याअगोदर बंगळुरुचा आयपीएल कॅम्प (RCB Camp) सुरु होत आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 1 एप्रिल रोजी चेन्नईला पोहोचणार आहे. त्याअगोदर तो तीन दिवस घरी आराम करेल. (IPL 2021 Virat Kohli join RCB Camp on 1 April)
इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात कोहलीच्या नेतृत्वाखालील टीमने खास अंदाजात मालिकेचा गोड शेवट केला. इंग्लंडला एकदिवसीय मालिकेत 2-1 ने धुळ चारली. मालिका संपताच आता आयपीएलच्या नव्या मोसमासाठी खेळाडू आपल्या फ्रॅचायजीसाठी रवाना होत आहे. आरसीबीच्या दिग्गजांनीही चेन्नईत जमायला सुरुवात केली आहे. अनेक खेळाडूंनी थेट पुण्यातूनच आपापल्या फ्रॅचायजींना जॉइन होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खेळाडू आपल्या कॅम्पसाठी रवाना झाले आहेत. तत्पूर्वी विराट 1 एप्रिलला आरसीबीचा कॅम्प जॉइन करणार आहे.
आरसीबीच्या ट्रेनिंग कॅम्पला आजपासून (मंगळवार ता. 30 मार्च) सुरुवात झाली आहे. विविध खेळाडूंनी ट्रेनिंग कॅम्प जॉईन केला आहे. या कॅम्पमध्ये विविध रणनिती, खेळाडूंची बलस्थाने, त्यांच्यातील उणीवा यांवर चर्चा होणे अपेक्षित असतं. आजपासून बंगळुरुचे खेळाडू कॅम्पमध्ये कसून सरावाला सुरुवात करतील.
टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज चेन्नईला रवाना झाले आहेत. दरम्यान सध्या माइक हेसन, प्रशिक्षक संजय बांगर, बोलर वनदीप सैनीसह आणखी काही खेळाडू उपस्थित आहेत.
आयपीएल 2021 या हंगामातील सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चेन्नईत पार पडणार आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आपापल्या संघांना जेतेरद मिळवून देण्यास उत्सुक असतील.
हे ही वाचा :