मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2022 हंगामाची लिलाव प्रक्रिया (IPL 2022 Acution) 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरु येथे होणार आहे. या लिलावात अनेक मोठे खेळाडू सामील आहेत, ज्यावर फ्रेंचायझी भरपूर पैसा खर्च करण्यास तयार असतील. कोणता खेळाडू सर्वाधिक किमतीला विकला जातो याकडे सर्वांच्या नजरा असतील. महा लिलावात (Mega Acution) सर्वात महागड्या खेळाडूचे विक्रम दरवर्षी होत नाहीत. तरीही उत्सुकता कायम असणा आहे. या उत्सुकतेमागचं कारण म्हणजे गेल्याच वर्षी आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वाधिक बोलीवर विकल्या गेलेल्या खेळाडूचा विक्रम झाला होता. ज्या खेळाडूवर ही बोली लागली त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. हा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस होता. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) त्याच्यावर तब्बल 16.25 कोटी रुपयांची बोली लावून त्याला संघात घेतले होते.
एक वर्षापूर्वी, जेव्हा आयपीएल 2021 च्या हंगामासाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता, तेव्हा काही परदेशी खेळाडूंची जोरदार चर्चा झाली होती. आरसीबीने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसनला 15 कोटींना आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला 14.25 कोटींना खरेदी केले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनवर पंजाब किंग्जने 14 कोटी रुपयांची बोली लावली होती. पण या सगळ्यावर राजस्थान रॉयल्स आणि ख्रिस मॉरिसने मात केली. मॉरिसला खरेदी करण्यासाठी राज्स्थानने आयपीएल इतिहासातील गेल्या 14 वर्षातील सर्व रेकॉर्ड मोडित काढले.
ख्रिस मॉरिसने लिलावापूर्वी आपली बेस प्राईस 75 लाख रुपये ठेवली होती, मात्र त्याचे नाव येताच संघांमध्ये खळबळ उडाली. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनीही त्याच्यावर बोली लावली, पण मॉरिसला राजस्थान रॉयल्सने सर्वाधिक 16.25 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले. यासह मॉरिस हा आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. म्हणजेच बेस प्राईसपेक्षा 20 पट जास्त पैसे त्याला मिळाले. त्याने माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा विक्रम मोडला, ज्याला 2015 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने 16 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
मॉरिसवर याच्या एक वर्ष आधीच्या आयपीएल लिलावातही पैशांचा पाऊस पडला होता. 2020 च्या लिलावात त्याला RCB ने 10 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र फ्रेंचायझीने त्याला फक्त एका हंगामानंतर संघातून मुक्त केले. त्याच वेळी, राजस्थान रॉयल्सने देखील मॉरिसला कायम ठेवण्याऐवजी केवळ एका हंगामानंतर संघातून मुक्त केले. राजस्थानसाठी या मोसमात, मॉरिसने 11 सामन्यात सर्वाधिक 15 विकेट घेतल्या, तर फलंदाजी करताना केवळ 67 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेचा हा अष्टपैलू खेळाडू आतापर्यंत आयपीएलच्या 8 हंगामांमध्ये खेळला आहे. या काळात 4 वेगवेगळ्या फ्रेंचायझींसाठी तो खेळला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि राजस्थान रॉयल्ससाठी एकूण 81 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 8 च्या इकोनॉमी रेटने आणि 24 च्या सरासरीने 95 बळी घेतले आहेत. त्याच वेळी, 155 च्या स्ट्राइक रेटने 618 धावा केल्या आहेत. मॉरिस या वर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही, कारण त्याने गेल्या महिन्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
इतर बातम्या
IPL 2022 Auction: आयपीएल लिलावाआधीच किंग्ज इलेव्हन पंजाबला मोठा झटका, वसीम जाफर यांनी दिला राजीनामा
Rohit Sharma: हुकूम सर आँखो पर, रोहीत शर्माच्या त्या प्रसंगावर चहलचं पहिल्यांदाच उत्तर