मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2022 चे वेळापत्रक (IPL 2022 Schedule) गेल्या आठवड्यात जाहीर झालं. त्यानुसार चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK Vs KKR) यांच्यात 26 मार्च रोजी पहिला सामना होणार आहे. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहायला मिळेल, जो संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. आयपीएल 2022 लीगचा (Indian Premier League) शेवटचा सामना 22 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जचे हे दोन संघ आमनेसामने असतील. यावर्षी लीगमधील सर्व सामने देशातच खेळवले जाणार आहेत. लीग राऊंडमधील सर्व 70 सामने मुंबई आणि पुण्याच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. मुंबईत वानखेडे, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या तीन स्टेडियम्सवर सामने होणार आहेत. पुण्यात 15 मॅचेस होतील. सर्व संघ वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी चार-चार सामने खेळतील. त्याशिवाय पुणे आणि ब्रेबॉर्न प्रत्येक संघाचे तीन-तीन सामने होतील.
यंदा आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रात होत असल्याने मुंबई इंडियन्सला त्यांचं होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर खेळताना खूप फायदा होईल, असा सूर इतर फ्रँचायझींमध्ये होता. त्यामुळे काही फ्रँचायझींना असं वाटत होतं की, मुंबई इंडियन्सचे सामने वानखेडेवर आयोजित केले जाऊ नयेत. अथवा तिथे मुंबईचे सामने कमी असायला हवेत, अशीही मागणी इतर संघांच्या चाहत्यांची होती. त्यानुसार मुंबईचे बहुतांश सामने ब्रेबॉर्न स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहेत. त्याचबरोबर मुंबईला त्यांचं होम ग्राऊंड असलेल्या वानखेडेच्या मैदानात 4 सामने खेळायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे मुंबईचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ससोबतचा सामनादेखील वानखेडेवर खेळवला जाणार आहे.
दरम्यान, प्लेऑफ संबंधी कुठलाही निर्णय झालेला नाही. फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. सर्व 10 संघ प्रत्येकी 14 सामने खेळणार आहेत.
तारीख | विरुद्ध | स्टेडियम | ठिकाण |
27 मार्च | दिल्ली कॅपिटल्स | ब्रेबॉर्न स्टेडियम | मुंबई |
2 एप्रिल | राजस्थान रॉयल्स | डीवाय पाटील स्टेडियम | मुंबई |
6 एप्रिल | कोलकाता नाइट रायडर्स | एमसीए स्टेडियम | पुणे |
9 एप्रिल | रॉयल चँलेंजर्स बँगलोर | एमसीए स्टेडियम | पुणे |
13 एप्रिल | पंजाब किंग्स | एमसीए स्टेडियम | पुणे |
16 एप्रिल | लखनौ सुपर जायंट्स | ब्रेबॉर्न स्टेडियम | मुंबई |
21 एप्रिल | चेन्नई सुपर किंग्स | डीवाय पाटील स्टेडियम | मुंबई |
24 एप्रिल | लखनौ सुपर जायंट्स | वानखेड़े स्टेडियम | मुंबई |
30 एप्रिल | राजस्थान रॉयल्स | डीवाय पाटील स्टेडियम | मुंबई |
6 मे | गुजराज टायटन्स | ब्रेबॉर्न स्टेडियम | मुंबई |
9 मे | कोलकाता नाइट राइडर्स | डीवाय पाटील स्टेडियम | मुंबई |
12 मे | चेन्नई सुपर किंग्स | वानखेडे स्टेडियम | मुंबई |
17 मे | सनरायझर्स हैदराबाद | वानखेडे स्टेडियम | मुंबई |
21 मे | दिल्ली कॅपिटल्स | वानखेडे स्टेडियम | मुंबई |
MI vs ___? ?
Paltan, which match excites you the most? ??#OneFamily #MumbaiIndians #TATAIPL pic.twitter.com/kHxg0nCaDI
— Mumbai Indians (@mipaltan) March 6, 2022
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, कायरन पोलार्ड, डॅनियन सॅम्स, संजय यादव, टिम डेव्हिड, फॅबियन अॅलन, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर , टायमल मिल्स, अर्शद खान, जयदेव उनाडकट, रायली मेरेडिथ, बेसिल थंपी, इशान किशन, आर्यन जुयाल, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन
26 मार्च – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
27 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (दुपारी 3.30 वाजता) – ब्रेबोर्न स्टेडियम
27 मार्च – पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
28 मार्च – गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
29 मार्च – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
30मार्च – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
31 मार्च – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
1 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज
2 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30 वाजता) – डी. वाय. पाटील स्टेडियम
2 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
3 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज
4 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
5 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
6 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम
7 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
8 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स
9 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (दुपारी 3.30 वाजता)
9 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स – महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम
10 एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30 वाजता)
10 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
11 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स
12 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
13 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज
14 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
15 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
16 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (दुपारी 3.30 वाजता)
16 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
17 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (दुपारी 3.30 वाजता)
17 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
18 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
19 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
20 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज
21 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
22 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
23 एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स (दुपारी 3.30 वाजता)
23 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
24 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
25 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
26 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स
26 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
28 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
29 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
30 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (दुपारी 3.30 वाजता)
30 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
1 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (दुपारी 3.30 वाजता)
2 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
2 मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
3 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज
4 मे – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
5 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
6 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
7 मे – पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30 वाजता)
7 मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
8 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (दुपारी 3.30 वाजता)
8 मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
9 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
10 मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
11 मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
12 मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
13 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज
14 मे – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
15 मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (दुपारी 3.30 वाजता)
15 मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
16 मे – पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
17 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
18 मे – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
19 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स
20 मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
21 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
22 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज
इतर बातम्या
LIVE चर्चेत अचानक Harsha Bhogle यांना काय झालं? Video पाहून चाहत्यांना धक्का, नेमकं काय झालं?
PAK VS AUS: Shaheen Afridi ने आधी वॉर्नरला ठसन दिली, आता दांडी उडवली, एकदा बघाच, हा ‘कडक’ VIDEO