मुंबई : थोड्याच वेळात आयपीएलमध्ये (IPL 2022) पंधराव्या हंगामातील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सामना वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium Mumbai) सुरु होणार आहे. मात्र, सामन्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सवर कोरोनाचं सावट आलंय. एकीकडे दोन्ही संघांमध्ये बरोबरीची स्पर्धा आहे. या सामन्यात दोन्ही संघातील उपस्थित जादूगारांवर प्रामुख्याने नजर असेल. गेल्या सामन्यात हॅटट्रिक करणारा युझवेंद्र चहल या मोसमात 17 बळी घेऊन डोक्यावर जांभळ्या रंगाची टोपी घातला आहे. तर मनगटाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव 13 बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याली आहे. हा सदस्य पाँटिंगसोबत हॉटेलमध्ये थांबला होता. अशा परिस्थितीत पाँटिंगला आज होणाऱ्या दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. कोरोना बाधित सदस्याला वेगळे करण्यात आले आहे.
दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. गेल्या काही दिवसांत दिल्ली संघात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. 15 एप्रिलला संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट प्रथम कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं. यानंतर 16 एप्रिलला दिल्लीचे स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट चेतन कुमार यांनाही संसर्ग झाला होता. 18 एप्रिलला ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श, टीम डॉक्टर अभिजित साळवी, सोशल मीडिया कंटेंट टीम मेंबर आकाश माने यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. 20 एप्रिलला दिल्लीच्या संघाचा आणखी एक खेळाडू न्यूझीलंडच्या टीम सेफर्टला कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. आता पाँटिंगच्या कुटुंबातील एका सदस्यालाही संसर्ग झाल्याचं आढळून आलंय. दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये एकूण संक्रमितांची संख्या सात झाली आहे. पाँटिंगचा कोरोना अहवाल दोन वेळा निगेटिव्ह आलाय. तर त्याच्या कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह आले आहे. पण खबरदारी म्हणून त्याला पाच दिवस वेगळे राहण्यास सांगितलंय. त्यामुळे तो आजच्या सामन्यात मैदानावर उपस्थित राहणार नाही.
मिशेल मार्श आणि सेफर्ट यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर 20 एप्रिलला दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यावरही टांगती तलवार होती. सेफर्ट व्यतिरिक्त, उर्वरित कर्मचारी आणि खेळाडू निगेटीव्ह आले. अशा स्थितीत प्रथम सामन्याचे ठिकाण बदलून पुणे ते मुंबई करण्यात आले होते. त्यानंतर सामनाही आयोजित करण्यात आला. दिल्लीने ती जिंकली होती. सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंना हस्तांदोलन करण्यास मनाई करण्यात आली होती.
इतर बातम्या
MS Dhoni, IPL 2022 : धोनीने आधी घेतला मुंबई इंडियन्सचा वर्ग, नंतर घेतला युवा खेळाडुंचा मास्टर क्लास