मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) संघ मंगळवारी विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात संघाला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना एक वेळ खूप रोमांचक स्थितीत होता, पण राजस्थानला हा सामना जिंकता आला नाही. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून झालेल्या पराभवानंतर कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) म्हणाला की, “हा सामना आमच्या आवाक्याबाहेर कधी गेला हे मी सांगू शकत नाही.”
राजस्थान विरुद्ध बँगलोर सामन्यात रोलरकोस्टर सारखे अनेक चढ-उतार होते. अभेद्य, अजिंक्य वाटणाऱ्या संजू सॅमसनच्या (राजस्थान संघावर फाफ डू प्लेसिसच्या बँगलोरने ‘रॉयल‘ विजय (RR vs RCB) मिळवला. चांगल्या सुरुवातीनंतर RCB चा संघ एका टप्प्यावर सामना गमावतोय असं चित्र निर्माण झालं होतं. पण अनुभवी दिनेश कार्तिकने शाहबाज अहमदच्या साथीने सामन्याचं चित्र बदलून टाकलं. टी-20 क्रिकेटमधली खरी रंगत या सामन्यामधून अनुभवता आली. टी 20 संघाने वेगवान सुरुवात केली असेल अथवा धीमी. सामन्याचं चित्र पालटण्यासाठी केवळ एक-दोन षटकंदेखील पुरेशी असतात. तेच मंगळवारच्या सामन्यात घडलं.
आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसीसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि राजस्थानच्या संघाला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं. राजस्थान रॉयल्सने जॉस बटलरच्या सहा षटकारांच्या जोरावर नाबाद 70 धावा आणि शिमरॉन हेटमायरच्या नाबाद 42 धावांच्या जोरावर तीन बाद 169 धावा केल्या होत्या. या जोडीने चौथ्या विकेटसाठी केलेल्या नाबाद 83 धावांच्या भागीदारीच्या जोरावर राजस्थानला 169 धावांपर्यंत मजल मारता आली. एक वेळ राजस्थान रॉयल्सचा संघ सामना जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत होता, पण ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरलेला दिनेश कार्तिक (नाबाद 44) आणि शाहबाज अहमद (45) यांनी अक्षरशः राजस्थानच्या तोंडचा घास हिरावला. दोघांनी नाबाद माघारी परतत संघाला चार गडी राखून विजय मिळवून दिला. आरसीबीचा हा तीन सामन्यांमधील दुसरा विजय आहे.
सामना संपल्यानंतर संजू सॅमसन म्हणाला, “हा सामना आमच्या आवाक्याबाहेर कधी गेली हे सांगता येणार नाही. पण आमच्या संघाने नाणेफेक गमावूनही ही धावसंख्या उभारण्यासाठी चांगला प्रयत्न केला. ती सन्मानजनक धावसंख्या होती. या सामन्यात बर्याच सकारात्मक गोष्टी पाहायला मिळाल्या आणि त्यातून आम्हाला खूप काही शिकता येतं.” रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस म्हणाला, ”अशा सामन्यात पुनरागमन करण्यासाठी संघात एखादा मातब्बर खेळाडू लागतो आणि डीके (दिनेश कार्तिक) असाच एक खेळाडू आहे. तो इतका शांत आहे की, इतर सहकारी त्याच्यासोबत आरामात खेळतात.
संजू म्हणाला, ‘मला वाटतं आम्ही 19 व्या षटकापर्यंत चांगली गोलंदाजी केली, युझवेंद्र चहलनेदेखील जोरदार हल्ला चढवला होता. पण चांगले खेळाडू कुठूनही सामना फिरवू शकतात. सामनावीर ठरलेला दिनेश कार्तिक विजयानंतर म्हणाला, ‘मला वाटतं यंदा मी माझ्या क्षमतेला न्याय दिला आहे. या वर्षी मी ज्या पद्धतीने प्रशिक्षण घेतलं की माझा खेळ गेल्या वर्षीपेक्षा अजून सुधारला आहे. मी स्वतःला पटवून देतोय की मी अजूनही चांगला खेळाडू आहे.
इतर बातम्या
Virat Kohli Runout IPL 2022: सॅमसनचा सुपरमॅन थ्रो, चहलची चालाकी आणि विराट RUNOUT पहा VIDEO
IPL 2022, Orange Cap : इशानची सत्ता गेली, ऑरेंज कॅपवर आता ‘बटलर’राज, पर्पल कॅपच्या यादीतही बदल