मुंबई : चेन्नईचा संघ (CSK) हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाने चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. लखनऊचा संघ (LSG) प्रथमच या स्पर्धेत सहभागी झाला असला तरी लखनऊच्या खेळाडूंनाही आयपीएलचा (IPL 2022) भरपूर अनुभव आहे. विशेष म्हणजे या संघातील सर्व मोठे खेळाडू जुन्या आयपीएल संघांचा भाग राहिले आहेत. आजचा सामना विजयाच्या शोधात असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये असून तो मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. एलएसजी आणि सीएसके या दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावलाय. लखनऊ सुपर जायंट्सला पहिल्या सान्यात गुजरातविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तर दुसरीकडे चेन्नईला कोलकात्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता आयपीएलच्या या सातव्या सामन्यात कुणाला विजयश्री खेचून आणता येतो, लखनऊचा संघ जडेजाला रोखणार की केएल राहुल बाजी मारणार बाजी?, हे आज संध्याकाळी सात वाजताच कळेल. दरम्यान, आजचा सामना रोमांचक होणार, असंच चहुकडे बोललं जातंय.
लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दोन्ही संघ वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदा फलंदाजी केल्यानंतर त्यांना सामना गमवावा लागला होता. ब्रेबोर्न स्टेडियमवरील परिस्थिती देखील वेगळी नाही आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांचा यापूर्वी देखील पराभव झाला आहे. त्यामुळे विजयासाठी दोन्ही संघ प्रयत्नशिल असतील. दुसरीकडे राहुल आणि जडेजा हे दोघे कॅप्टन म्हणून पहिल्यांदाच समोर असणार आहेत.
आजचा सामना विजयाच्या शोधात असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये असून तो आज खेळवला जाणार आहे.
आजचा सामना विजयाच्या शोधात असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये असून तो आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे.
आजचा लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये असून तो मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता रंगणार आहे. दोन्ही संघाकडून विजयासाठी रस्सीखेच असले.
लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस 1, स्टार स्पोर्टस 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 यावर पाहता येईल.
लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज सामना लाइव्ह स्ट्रीमिंगसह डिस्ने+हॉटस्टारवर, jIO TV आणि Airtel TV वर पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.
इतर बातम्या
Aurangabad VIDEO | वाळूजमध्ये दुर्लभ कश्यप गँगचा धुमाकूळ, भर रस्त्यात 4-5 जणांना बेदम मारहाण
या 5 राशींसाठी चैत्र नवरात्री असणार खूप खास, पैशाचा पाऊस पडणार, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी