मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजन सीजनमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि गुजरात टायटन्स (GT) या दोन्ही संघाचा सामना आज संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये (Maharashtra Cricket Association Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलचं सीजन आता अंतिम टप्प्याकडे जात आहे. यासह टॉप चार शर्यत खूपच मनोरंजक होत आहे. या शर्यतीत दोन संघ आघाडीवर आहेत. ते या हंगामातील दोन नवीन संघ आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. कारण, या सामन्यातील विजयी संघ हा प्लेऑफमध्ये पोहोचेल. लखनौ आणि गुजरात या दोन्ही संघांचे सोळा-सोळा गुण आहेत. मात्र, चांगल्या नेट रेटमुळे लखनौचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. तर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात बराच काळ नंबर एकवर होता. पण, गुजरातचा मागील दोन समान्यांमध्ये पराभव झाल्यामुळे नंबर वनची खुर्ची गमावली आहे.
लखनौचा संघ शेवटच्या चार सामन्यात विजय मिळवत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आणखी आत्मविश्वास आलाय. या दोन्ही संघांमधील हा या मोसमातील दुसरा सामना आहे. यापूर्वी 28 मार्चला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरया दोन्ही संघांचा सामना झाला होता. ज्यामध्ये गुजरातने विजय मिळवला होता. तो सामना देखील दोन्ही संघांचा आयपीएलमधील पहिला सामना होता. आता लखनौ त्या पराभवाची बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.
या सामन्यात गुजरातला विजयी ट्रॅकवर परतणं गरजेचं आहे. मुंबईविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात गुजरातसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शुभमन गिलने अर्धशतक झळकावून फॉर्ममध्ये पतरण्याचे संकेत दिले होते आणि त्याचा साथीदार रिद्धिमा साहानेही अर्धशतक ठोकले होते. संघाचे उर्वरित फलंदाज आणि गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. फक्त लखनौविरुद्ध जुना फॉर्म दाखवण्याची गरज आहे. गुजरात या सामन्यासाठी प्लेइंग – 11मध्ये बदल करेल असी शक्यता नाही. कोणी जखमी झाले तरच हा संघ बदलाचा विचार करेल.
#TitansFAM, swipe right to see the game face on! ?@vijayshankar260 @rahultewatia02 @Abhinavms36 @NalkandeDarshan #SeasonOfFirsts #AavaDe #LSGvGT pic.twitter.com/wV8UKOlo0O
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 10, 2022
लखनौने त्यांच्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवला होता. त्यांनी कोलकाचा पराभव केला होता. गुजरातसारख्या बलाढ्य संघासमोर लखनौ सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे. तोच फॉर्म सुरू ठेवावा लागेल. गेल्या सामन्यात क्विंटन डी कॉकने अर्धशतक झळकावले आणि दीपक हुडानेरही रंग दाखवला होता. आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर यांनीही या मोसमात बॅटने प्रभाव पाडला आहे. रवी बिश्नोईला गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नसली तरी राहुल त्याच्यावर विश्वास ठेवेल.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन: रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (क), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल (क), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पांड्या, आयुष बडोनी, जेसन होल्डर, दुष्मंता चमीरा, रवी बिश्नोई, आवेश खान, मोहसिन खान.