मुंबई : आज आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सचा (MI vs LSG) सामना होतो आहे. या सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचं विशेष लक्ष असणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत लखनौ (LSG) आतापर्यंत पाच सामने खेळला असून त्या सामन्यांपैकी लखनौने तीन सामने जिंकले आहे. तर दोन सामन्यात लखनौला पराजयाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेचा विचार केल्यास आणि आजच्या सामन्याविषयी बोलल्यास मुंबई इंडियन्सला देखील विजयाची भूक लागली आहे. मुंबई इंडियन्सचा संघ सलग पाच सामने हरला असून आजच्या सामन्यात पूर्ण संघ विजयश्री खेचून आणण्याचा प्रत्येक प्रयत्न करेल. त्यामुळे लखनौला मुंबई इंडियन्सचं आव्हान असणार आहे. चांगल्या संघाच्या जोरावर मुंबई इंडियन्सला टक्कर देण्यासाठी खेळाडू डावपेच आखतीलच. पण, मुंबई इंडियन्सची विजयाची भूक लखनौ कितपत रोखू शकेल, हे आजच्या सामन्यात पाहता येईल.
आज खेळवल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सच्या सामन्यात गुणतालिकेचा विचार केल्यास यामध्ये मुंबई इंडियन्सने अद्यापही खातं उघडलेलं नाही. तर दुसरीकडे लखौचा संघा गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. त्यामुळे लखनौला आज गुणतालिकेत आगेकुच करण्याची संधी असणार आहे. आज लखनौ कशी कामिगिरी करणार, याकडे लक्ष असेल.
आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये आतापर्यंत पाचवेळा जेतेपदी राहिलेल्या इंडियन्सला यंदा खेळवलेल्या पाच सामन्यात एकदाही यश आलेलं नाही. सलग पाच सामन्यात मुंबई इंडियन्स पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे आयपीएलच्या गुणतालिकेत तो अखेरच्या म्हणजेच दहाव्या स्थानी आहे. त्यामुळे आजच्या मुंबई इंडियन्सच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. त्यामुळे लखनौ चांगली कामगिरी करणं अपेक्षित आहे. नसात मुंबई इंडियन्स हा सामना खिशात घालून विजयावर शिक्कामोर्तब करेल.
लखनौचा विचार केल्यास त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहे. केएल राहुल, क्विंटन डी कॉक हे आज कमाल करु शकतात. लखनौचा संघ आयपीएलमध्ये मध्यावर आहे. त्यामुळे वर जाण्याचं त्यांचं ध्येय सहज शक्य होऊ शकतं.
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टोइनिस, दीपक हुड्डा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, एंड्रयू टाय, रवि बिश्नोई, आवेश खान.
इतर बातम्या
Nanded Murder : नांदेडमध्ये मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन तरुणाची हत्या
Gunratna Sadavarte wife: जयश्री पाटील नॉट रिचेबल! मुंबई पोलिसांकडून शोध घेण्याचे प्रयत्न सुरु