मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 23 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Mumbai Indians vs Punjab Kings) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना 13 एप्रिल रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने अद्याप विजयाचे खाते उघडलेले नाही. मुंबईने स्पर्धेत आतापर्यंत सलग चार सामने गमावले असून गुणतालिकेत मुंबईचा संघ नवव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या संघाने चांगला खेळ दाखवला आहे. पंजाबचा संघ सध्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. चार सामन्यांपैकी दोन सामने त्यांनी जिंकले आहेत, तर दोन गमावले आहेत. दोन्ही संघांना मागील सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
पंजाब किंग्जचा संघ खूपच संतुलित दिसत आहे. लियाम लिव्हिंगस्टन त्यांच्यासाठी झटपट धावा करत आहे. मात्र, आतापर्यंत शिखर धवन, मयंक अग्रवाल यांच्याकडून एकही मोठी खेळी पाहायला मिळालेली नाही. जॉनी बेअरस्टोने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात पंजाबकडून पदार्पण केले. अशा स्थितीत संघाला त्याच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असेल. ओडिन स्मिथ आपली जागा कायम ठेवतो की बाहेर जातो हे पाहणे बाकी आहे. गेल्या तीन सामन्यांत तो अपयशी ठरला आहे. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि इशान किशन यांच्याशिवाय उर्वरित फलंदाजांना ना मैदानात टिकता आलंय ना धावा करता आल्या. पण संघासाठी सर्वात मोठी चिंता गोलंदाजीची आहे. कारण जसप्रीत बुमराहशिवाय इतर गोलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत.
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जमधील सामना 13 एप्रिलला म्हणजेच बुधवारी खेळवला जाणार आहे.
आयपीएल 2022 मध्ये, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे.
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यासाठी नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता खेळाला सुरुवात होईल.
आयपीएल 2022 मधील मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.
डिस्ने+हॉटस्टार वर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जमधील सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग सदस्यत्वासह पाहू शकता. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स आणि कव्हरेज वाचता येईल.
इतर बातम्या
SRH vs GT Match Result: आज ती खूप आनंदी असेल, हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सचं काय चुकलं?