मुंबई : एक-दोनदा नव्हे तर तब्बल पाच वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सची आयपीएल 2022 मध्ये खराब सुरुवात झाली आहे. मुंबईला दिल्लीविरुद्ध पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता विजयाचं खातं उघडण्यासाठी शनिवारी होणाऱ्या डबल हेडर सामन्यात संघाचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) संघाला या सामन्यात कोणत्याही किंमतीत विजय मिळवायचा आहे जेणेकरून त्यांना यंदाच्या मोसमातील विजयाचं खातं उघडता येईल. मात्र, संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) संघ पहिला सामना जिंकल्यानंतर मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरणार असल्याने मुंबईसाठी हे आव्हान सोपं नसेल
या मोसमातील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी झाला. या सामन्यात त्यांनी हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. तर मुंबईचा दिल्लीकडून पराभव झाला. आता दोन्ही संघ आमनेसामने येतील तेव्हा राजस्थान रॉयल्सचा संघ आपली मागील आकडेवारी सुधारण्याचा प्रयत्न करेल. आकडेवारीचा विचार करता मुंबईचा संघ राजस्थानवर थोडा वरचढ राहिला आहे.
दोन्ही टीम्सच्या प्लेइंग इलेवन बद्दल बोलायचं झाल्यास मुंबई इंडियन्ससाठी एक जमेची बाजू आहे. सूर्यकुमार यादव उद्याच्या सामन्यात खेळू शकतो. त्यामुळे मुंबई इंडियन्सची मधली फळी बळकट होणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत सूर्युकमार यादवला दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून न सावरल्यामुळे सूर्यकुमार दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. अनमोलप्रीत सिंहच्या जागेवर सूर्यकुमारला संघात स्थान दिले जाईल.
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील IPL-2022 मधला सामना शनिवार, 2 एप्रिल रोजी खेळवला जाईल
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा सामना मुंबईच्या डॉ. डी. वाय.पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यासाठी दुपारी 3 वाजता नाणेफेक होणार आहे, तर पहिला डाव 3.30 वाजता सुरू होईल.
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.
लाइव्ह स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनसह Disney+Hotstar वर सामना ऑनलाइन पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील
इतर बातम्या