मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आणि त्यांच्या खेळाडुंना नेमकं काय झालंय. हे क्रिकेट चाहत्यांना अद्यापही कळायला मार्ग नाही. आतापर्यंत आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपदी राहिलेल्या इंडियन्सला आतापर्यंत खेळवलेल्या पाच सामन्यात एकदाही यश आलेलं नाही. सलग पाच सामन्यात मुंबई इंडियन्स पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे आयपीएलच्या गुणतालिकेत तो अखेरच्या म्हणजेच दहाव्या स्थानी आहे. तर मुंबई इंडियन्सचा आज लखनौ सुपर जायंट्ससोबत (LSG) सामना होतो आहे. लखनौ आयपीएलच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. लखनौने एकूण पाच सामने आतापर्यंत खेळले आहेत. त्यापैकी तीन जिंकले आहेत. तर दोन सामन्यात लखनौला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात लखनौ पुन्हा मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या गुणतालिकेत खातं उघडण्यापासून रोखणार की मुंबई इंडियन्स आयपीएलच्या गुणतालिकेत आपलं खातं उघडणार, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
सलग पाच सामने हरलेल्या मुंबई संघाला आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये सेमी फायनलपर्यंत पोहचायचं आहे तर इंडियन्सला 2015चा फॉर्म्यूला वापरावा लागेल. त्यावेळी देखील इंडियन्स पहिल्या सहा सामन्यात सुरुवातीला फक्त एकच सामना जिंकला होता. त्यानंतर रोहित शर्माच्याच नेतृत्वात संघाने चांगला विजय मिळवला होता. प्लेऑफ पोहचून त्यावेळी इंडियन्सने दुसऱ्यांदा जेतेपद पटकावलं होतं. तो फॉर्म्यूला यंदा वापरल्यास इंडियन्स पुढील सामने सहज जिंकू शकतो. मुंबई इंडियन्स उरलेले नऊ सामन्यातील एक किंवा दोन सामने पराजीत होत असेल तर इंडियन्सला नेट रनरेट आणि इतर संघांच्या विजय-पराजयावर अवलंबून रहावं लागेल.
आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये आतापर्यंत पाचवेळा जेतेपदी राहिलेल्या इंडियन्सला यंदा खेळवलेल्या पाच सामन्यात एकदाही यश आलेलं नाही. सलग पाच सामन्यात मुंबई इंडियन्स पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे आयपीएलच्या गुणतालिकेत तो अखेरच्या म्हणजेच दहाव्या स्थानी आहे. त्यामुळे आजच्या मुंबई इंडियन्सच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे.
अजूनही मुंबई इंडियन्स संघाची घडी बसलेली नाही. मुंबई इंडियन्सची टीम अजूनही चाचपडतेय. पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्सला आजच्या सहाव्या सामन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. गुणतालिकेत मुंबईचा संघ सर्वात तळाला आहे. मुंबई इंडियन्सच्या या स्थितीवर कोणाला विश्वास बसणार नाही, पण हे आजचं वास्तव आहे. त्यामुळे आजच्या कामगिरीकडे गुणतालिकेतील भविष्य अवलंबून आहे.
रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, कायरन पोलार्ड, टिम डेविड, डेनियर सॅम्स, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह, बासिल थम्पी.
इतर बातम्या
Health Tips : हलासन करा, मणक्याच्या आणि पाठीच्या दुखण्यापासून कायमचा आराम मिळवा!