मुंबई : आयपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये कोलकातानं बलाढ्य चेन्नईला पराभवाची धूळ चारली. आता उत्सुकता रविवारच्या डबल हेडरची आहे. आज मुंबई इंडियन्सचा संघ दिल्लीशी (MI vs DC) भिडणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली मैदानात उतरले. तर दिल्लीचा संघ ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कॅप्टन्सीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. या सामन्याची उत्सुकता दिल्ली आणि मुंबईसह आयपीएलच्या सगळ्यांच चाहत्यांमध्ये आहेत. कारण या दोन्ही संघांनी मागच्या आयपीएलमध्ये एकमेकांना जोरदार टक्कर दिली होती. पहिला डबर हेडर सामना हा मुंबई आणि दिल्लीच्या संघातच होणार आहे. दुपारी सुरु होणाऱ्या या सामन्यात कुणाचं पारडं जड ठरणार, हे आज स्पष्ट होईल. सर्वाधिक बोली लावलेल्या ईशान किशनच्या कामगिरीकडे या सामन्यात सगळ्यांचं लक्ष असेल. ईशान किशनला मुंबईनं तब्बल 15.25 इतकी तगडी रक्कम देऊन रिटेन केलं होतं. बंगळुरुच्या होणाऱ्या सामन्यात दिल्लीचा संघ काहीसा कमकुवत होण्याची शक्यता आहे. कारण दिल्लीचे स्टार प्लेअर्स या सामन्याला मुकणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईसाठीही काहीशी चिंता वाढवणारा मुद्दा ठरणार आहे, तो म्हणजे मिडल ऑर्डरमध्ये नेमका खेळ कसा सांभाळायचा?
रोहित शर्माकडे यंदाचा आयपीएलचा सगळ्यात महागडा खेळाडू आहे. तो म्हणजे ईशान किशन. ईशान किशन गेल्या काही काळापासून चांगल्या फॉर्मात आहेत. ईशान यावेळी रोहित सोबत ओपनिंग करताना दिसेल. मुंबईच्या संघात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. मुंबईच्या संघाची रणनिती त्यामुळे या सीझनमध्ये नेमकी कशी राहते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
सूर्यकुमार नसताना मुंबईच्या मिडल ऑर्डरमध्ये तिलक वर्मा, अमनमोलप्रीत सिंह किंवा डेवॉल्ड ब्रेविस, पोलार्ड, टीम डेविड आणि संजय यादव यांच्या खांद्यावर जबाबदारी येणार आहे. तर दुसरीकडे बुमराहसह मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकटसह संजय यादवचाही फिरकीपटू म्हणूनही पाहायला मिळू शकतो.
वेगवेगळ्या क्रिकेट मालिका आणि सीरिजमुळे दिल्लीचे दिग्गज पाच खेळाडू सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहेत. यात डेविड वॉर्नर आणि मिशेल मार्स यांची उणिव ऋषभ पंतला भासू शकते. सध्या पाकिस्तानातीली दौऱ्यामुळे हे दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. 10 एप्रिलपासून ते संघासोबत सोडले जाणार आहेत.
तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचे लुंगी एनगिडी आणि बांगलादेशचे मुस्ताफिजुर रहमानही वेगळ्या सीरिजमध्ये खेळत आहेत. त्यामुळे ऋषभ पंतसाठी आजचा सामना आव्हानात्मक असणार आहेत. इतकंच काय तर घायाळ झालेल्या एनरिक नॉर्खिया पहिल्या सामन्याला मुकणार आहे. एनरिक नॉर्खिया हा एक फास्ट बॉलर असून तो दिल्लीच्या संघासाठी फार महत्त्वाचा आहे. या सगळ्या दिग्गजांच्या गैरहजेरीच ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाचाही कस लागेल.
??????? ??, अपने ही style mein, speaks about playing in familiar conditions & his excitement to play in front of our Paltan ?️?
Catch the full video ? https://t.co/HyRLf5K3Lt#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @ImRo45 MI Live pic.twitter.com/5NJpXE75gF
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2022