मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) चा 15 वा हंगाम सुरू झाला आहे आणि पहिल्या दोन दिवसातच या स्पर्धेने आपला रंग दाखवायला सुरुवात केली आहे. केवळ मैदानावरील स्पर्धाच नव्हे तर मैदानाबाहेरील मजेदार किस्से आणि घटनादेखील या स्पर्धेला खास बनवतात. विशेषत: परदेशी आणि भारतीय खेळाडूंची मैत्री, त्यांच्या गंमतीजंमती आणि हशा याला वेगळी ओळख देतात. असेच एक उदाहरण सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाच्या कॅम्पमध्ये पाहायला मिळाले, जिथे संघाचा स्टार फलंदाज निकोलस पूरन आणि उदयोन्मुख भारतीय वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Nicholas Pooran and Umran Malik Bet) यांच्यात पैज लागली होती.
IPL 2022 च्या मोसमातील सनरायझर्स हैदराबादचा पहिला सामना मंगळवारी (29 मार्च) होणार आहे आणि संघ देखील त्याच्या तयारीत व्यस्त आहे. साहजिकच, सर्व खेळाडूंना मोसमाची चांगली सुरुवात करण्यासाठी स्वत:ची चांगली तयारी करायची असते, तरीही सरावाच्या वेळी वातावरण हलके आणि निवांत राहण्याचा प्रयत्न केला जातो. निकोलस पूरननेही असाच प्रयत्न केला आणि त्याने आपल्या संघातील ज्युनियर खेळाडूला आव्हान दिलं आणि बाजी मारली.
एसआरएचच्या नेट सेशनदरम्यान उमरान मलिक गोलंदाजी करत असताना पूरन त्याच्या शेजारी उभा होता. उमरान त्याच्या रन-अपवर परतत असताना पूरनने एक पैज लावली, की जर उमरान त्याच्या पुढच्या चेंडूवर यॉर्कर टाकण्यात यशस्वी झाला तर तो उमरानला जेवायला घेऊन जाईल आणि जर तो तसे करू शकला नाही तर उमरानने पुरनला डिनरसाठी न्यायचं. जम्मू-काश्मीरच्या या युवा वेगवान गोलंदाजाने क्षणाचाही विलंब न लावता ही अट मान्य केली. मात्र, उमरानला त्याचे आव्हान पूर्ण करण्यात यश आलं नाही. उमरानने त्याचा चेंडू फुल टॉस टाकला, ज्यावर फलंदाजाने मोठा फटका लगावला.
Did Umran buy you dinner as promised, @nicholas_47? ?#OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/LvDlzFwUMc
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 28, 2022
उमरानने पूरणची अट पूर्ण केली नाही, पण पूरन आणि उमरान यांच्यात चांगली भागीदारी असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी उमरानने सराव सामन्यादरम्यान पूरनला त्याच्या वेगवान बाउन्सरने त्रास दिला होता, ज्याचा व्हिडीओही खूप शेअर केला जात होता. सरावात दोन्ही खेळाडूंमध्ये कितीही धमाल सुरू असली तरी, मंगळवार, 29 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या मोसमातील पहिल्या सामन्यात दोन्ही खेळाडूंना हैदराबादसाठी दमदार कामगिरी करायची आहे.
इतर बातम्या
SRH vs RR: हैदराबादकडे एकापेक्षा एक चांगले खेळाडू, रॉयल्सच्या दमदार खेळाडूंना रोखू शकेल सनरायझर्स?