IPL 2022, Orange Cap, Purple cap : ऑरेंज कॅपच्या यादीत कोण आहे पुढे? पर्पल कॅपवर कुणाचं राज्य?

| Updated on: Apr 14, 2022 | 9:07 AM

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील बुधवारी झालेल्या सामन्यात ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या यादीत बदल झालाय. ऑरेंज कॅपच्या यादीत कोण आहे पुढे? पर्पल कॅपवर कुणाचं राज्य? जाणून घ्या

IPL 2022, Orange Cap, Purple cap : ऑरेंज कॅपच्या यादीत कोण आहे पुढे? पर्पल कॅपवर कुणाचं राज्य?
पंजाबचा विजय
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 23व्या सामन्यात पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिस मैदानात आला तेव्हा संघाने 32 धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या आणि स्कोअर जैसे थेचं होता. संघासमोर 199 धावांचं मोठं लक्ष्य होतं. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) रणनीतीवर टीका करत होते की त्यांनी सूर्यकुमार यादवला पाठवायला हवे होते आणि अननुभवी 18 वर्षीय ब्रेव्हिसला नाही, परंतु त्यांना लवकरच लक्षात आले की ब्रेव्हिस काय आहे ते. खरे तर सहाव्या षटकात अर्शदीपला सलग दोन चौकार मारून ब्रेविसने आपली कामगिरी दाखवायला सुरुवात केली. पुढच्याच षटकात ओडिअन स्मिथने डीप स्क्वेअर लेगवर मोठा षटकार ठोकला, पण खरे वादळ अजून यायचे होते. 9व्या षटकात राहुल चहर गोलंदाजी करायला आला तेव्हा दुसऱ्या चेंडूवर ब्रेव्हिसला स्ट्राईक मिळाला. ब्रेव्हिस याला युनियर एबी डिव्हिलियर्स म्हणजेच बेबी एबी म्हटले जातं. कालच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीत नवा खेळाडू आला आहे.

मुंबई इंडियन्सचा पुन्हा पराभव

पुन्हा बुधवारी पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला 12 धावांनी नमवलं. मुंबईला विजयासाठी 199 धावांचं टार्गेट मिळालं होतं. पण मुंबई इंडियन्सला निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 186 धावांच करता आल्या. मेगा ऑक्शननंतर मुंबई इंडियन्सने नव्याने संघ बांधणी केली आहे. पण अजूनही या संघाची घडी बसलेली नाही. मुंबई इंडियन्सची टीम अजूनही चाचपडतेय. पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्सला सहाव्या सामन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. गुणतालिकेत मुंबईचा संघ सर्वात तळाला आहे. तर यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीतही बदल झाला असून शिखर धवनची एन्ट्री झाली आहे.

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज

गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
युझवेंद्र चहल26462
वानिंदू हसरंगा
24362
कागिसो रबाडा23406
उमरान मलिक
22444
कुलदीप यादव21419

पर्पल कॅपचा मानकरी कोण?

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे. त्याने आयपीएलच्या या पंधराव्या सीजनमध्ये एकूण 11 विकेट घेतल्या आहे. त्यानंतर क्रमांक लागतो तो उमेश यादव याचा. उमेशने एकूण 10 विकेट घेतल्या असून तो दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर पर्पल कॅपमध्ये तिसऱ्या स्थानी कुलदीप यादव आहे. त्याने 10 विकेट काढल्या आहे. चौथ्या स्थानी वानिंदू हसरंगा आहे. त्यानेही एकूण दहा विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. तर पाचव्या स्थानी टी नटराजन आहे. नटराजनने आठ विकेट घेतल्या आहेत.

इतर बातम्या

Mesha SankraMolestation | रात्रीची वेळ, कंडक्टरही नाही, बसच्या लास्ट सीटवर तरुणाचा विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंग

nti 2022 | मेष संक्रांतीच्या दिवशी हे उपाय करा, नशीब उजळून निघेल

आज पुन्हा सीएनजी, पीएनजीचे दर वाढले; देशातील सर्वात महाग सीएनजी गुरुग्राममध्ये