IPL 2022, Orange Cap, Purple cap : 9 षटकार मारुन उथप्पाची आगेकूच, ऑरेंज कॅपच्या यादीत कोण आहे पुढे? पर्पल कॅपवर कुणाचं राज्य?

| Updated on: Apr 13, 2022 | 1:59 PM

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील गुरुवारी झालेल्या सामन्यात ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या यादीत बदल झालाय. मंगळवारी CSK आणि RCBमध्ये झालेल्या सामन्यानंतर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या टेबलमध्ये बदल झालाय.

IPL 2022, Orange Cap, Purple cap : 9 षटकार मारुन उथप्पाची आगेकूच, ऑरेंज कॅपच्या यादीत कोण आहे पुढे? पर्पल कॅपवर कुणाचं राज्य?
शिवम दुबे
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आयपीएलमध्ये (IPL 2022) अखेर चेन्नई सुपर किंग्सची पहिल्या विजयाची प्रतिक्षा संपली. CSK ने RCB वर 23 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताने चेन्नईने (CSK) 216 धावा केल्या.  RCB ने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 193 धावा केल्या. चेन्नईने रांगेत चार पराभव पाहिल्यानंतर त्यांना विजय मिळाला. आधी KKR, PBKS, LSG आणि SRH कडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. शिवम दुबे आणि रॉबिन उथाप्पा चेन्नईच्या यंदाच्या सीजनमधल्या पहिल्या विजयाचे हिरो ठरले. शिवम दुबेने तुफान फटकेबाजी केली. त्याने 46 चेंडूत नाबाद 95 धावांची खेळी केली. यात पाच चौकार आणि आठ षटकार होते. रॉबिन उथाप्पा संकटमोचक ठरला. त्याने बिनधास्तपणे फटकेबाजी सुरु ठेवली. त्याने 50 चेंडूत 88 धावा फटकावल्या. यात चार चौकार आणि नऊ षटकार होते. या CSK आणि RCB च्या सामन्यानंतर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या यादीत बदल झालाय.

ऑरेंज कॅपवर कुणाचं राज्य?

आयपीएलमध्ये जॉस बटलर ऑरेंज कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने सर्वाधिक 218 धावा काढल्या आहेत. त्यानंतर नंबर येतो तो शिवम दुबेचा. शिवम दुबेनं 207 धावा आयपीएलच्या या सीजनमध्ये काढल्या असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर येतो उथप्पा. उथप्पाने आयपीएलच्या या सीजनमध्ये एकूण 194 धावा काढल्या आहेत. त्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑरेंज कॅपच्या चौथ्या क्रमांकावर क्विंटन डी कॉक आहे. त्याने या सीजनमध्ये एकूण 188 धावा काढल्या आहेत. त्यानंतर नंबर लागतो तो शुभमन गिलचा. शुभमन याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 187 धावा काढल्या असून तो पाचव्या क्रमांकावर आहे.

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज

गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
युझवेंद्र चहल26462
वानिंदू हसरंगा
24362
कागिसो रबाडा23406
उमरान मलिक
22444
कुलदीप यादव21419

पर्पल कॅपचा मानकरी कोण?

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे. त्याने आयपीएलच्या या पंधराव्या सीजनमध्ये एकूण 11 विकेट घेतल्या आहे. त्यानंतर क्रमांक लागतो तो उमेश यादव याचा. उमेशने एकूण 10 विकेट घेतल्या असून तो दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर पर्पल कॅपमध्ये तिसऱ्या स्थानी कुलदीप यादव आहे. त्याने 10 विकेट काढल्या आहे. चौथ्या स्थानी वानिंदू हसरंगा आहे. त्यानेही एकूण दहा विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. तर पाचव्या स्थानी टी नटराजन आहे. नटराजनने आठ विकेट घेतल्या आहेत.

इतर बातम्या

zodiac | या 5 राशीच्या मुलींना भरपूर प्रेम करणारा पती मिळतो, लग्नानंतर राणीसारख्या राहतात

Petrol-Diesel price : सलग सातव्या दिवशी इंधनाचे दर स्थिर, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

चुकीची रत्न देऊ शकतात आयुष्यभराच्या वेदना, जाणून घ्या रंजक माहिती