मुंबई : या आठवड्यात IPL 2022 साठी मेगा ऑक्शन (IPL 2022 Auction) होणार आहे. हा लिलाव अनेक अर्थाने खास असणार आहे, ज्यामुळे आगामी काही वर्षांसाठी संघांची रूपरेषा तयार होईल. यावेळी जुन्या आठ संघांव्यतिरिक्त दोन नवीन संघांचाही लिलावात (IPL 2022 Mega Auction) सहभाग असणार आहे. अहमदाबाद आणि लखनौ सुपर जायंट्सचे संघ पहिल्यांदाच लिलावात सहभागी होणार आहेत. अशा स्थितीत यावेळचा लिलाव खूपच रंजक असणार आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरु येथे लिलाव होणार आहे. लिलावापूर्वी, सर्वच संघांनी त्यांच्याकडील महत्त्वाच्या खेळाडूंना संघात (IPL Player Retention) कायम ठेवले आहे आणि आता ते उर्वरित पर्स व्हॅल्यूसह संघ पूर्ण करण्यासाठी लिलावात उतरतील.
सध्याच्या आठ संघांना यापूर्वी 4 खेळाडू संघात कायम ठेवण्याची संधी देण्यात आली होती. नियमांनुसार, प्रत्येक संघ जास्तीत जास्त चार खेळाडू कायम ठेवू शकतो, त्यामध्ये तीनपेक्षा जास्त भारतीय आणि दोनपेक्षा जास्त परदेशी खेळाडू असू शकत नाहीत. तसेच प्रत्येक संघ जास्तीत जास्त दोन अनकॅप्ड खेळाडू संघात कायम ठेवू शकतो. चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने एका परदेशी खेळाडूसह चार खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. आरसीबी, एसआरएच आणि राजस्थानने प्रत्येकी तीन खेळाडूंना कायम ठेवले आहे. पंजाब किंग्जने त्यांच्यासोबत फक्त दोन खेळाडू ठेवले आहेत.
सध्या पंजाब किंग्सच्या पर्समध्ये सर्वात जास्त पैसे आहेत. पंजाबच्या संघमालकांकडे 72 कोटी रुपये आहेत. पंजाब किंग्जनंतर सनरायझर्स हैदराबादकडे सर्वात जास्त पैसे आहेत. हैदराबादच्या पर्समध्ये 68 कोटी रुपये, राजस्थान रॉयल्सकडे 62 कोटी, लखनऊ संघाकडे 59 कोटी आणि अहमदाबादकडे 52 कोटी रुपये आहेत. याशिवाय चेन्नई, कोलकाता आणि मुंबईकडे 48 कोटी रुपये आहेत. दिल्लीकडे सर्वात कमी 47.50 कोटी रुपये शिल्लक आहेत.
इतर बातम्या
IPL 2022 Auction: 5 तगड्या खेळाडूंवर मुंबई इंडियन्सची नजर, पर्स रिकामी करणार?
IPL 2022: हार्दिकच्या अहमदाबाद फ्रेंचायजीने संघाच्या नावाची केली घोषणा, काय ठेवलं नाव?