मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये क्रिकेट संघांच्या पॉईंट्स टेबलमध्ये सतत बदल होतोय. शनिवारी झालेल्या सामन्यात ऑलराऊंडर हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने (Guajarat Titans) आयपीएल 2022 स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi capitals) 14 धावांनी पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 157 धावा केल्या. तर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये (Rajasthan royals vs Mumbai Indians) दिवसातील पहिला सामना झाला. जोस बटलरच्या जबरदस्त फलंदाजीमुळे राजस्थानने हा सामना जिंकला. राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सला मात देऊन पॉईंट्सच्या टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवलं. तर गुजरातनेही दुसऱ्यांदा दिल्ली कॅपिटलचा पराभव करुन पॉईंट्स टेबलमध्ये आगेकुच केली. आता सनराईजर्स हैदराबाद सोडून सगळेच संघ दोन सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त तीन संघ दोन-दोन सामने जिंकले शकले आहे. तर गुजरातने दोन सामने खेळून ते दोन्हीही सामने जिंकले आहेत. तर पॉईंट्स तालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या केकेआरनं तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवलाय.
राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये दिवसातील पहिला सामना झाला. जोस बटलरच्या जबरदस्त फलंदाजीमुळे राजस्थानने हा सामना जिंकला. जोस बटलरने यंदाच्या सीजनमधलं पहिलं शतक झळकावलं. तर ऑरेंज कॅपच्या यादीमध्ये बटलर दुसऱ्या स्थानी आहे.
गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलने आयपीएलच 2022 च्या दुसऱ्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावलं. शुभमन गिलने क्लासिक बॅटिंग दाखवली. त्याने 46 चेंडूत 84 धावा फटकावल्या. दिल्लीच्या गोलंदाजांवर त्याने हल्लाबोल केला. हाणामारीच्या षटकात धावांची गती वाढवताना खलील अहमदने त्याचा विकेट काढला. गिलने 46 चेंडूत 84 धावा फटकावल्या. यामुळे गुजरात पॉईंट्सच्या टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी गेला आहे.
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सला मात देऊन पॉईंट्सच्या टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवलं. तर गुजरातनेही दुसऱ्यांदा दिल्ली कॅपिटलचा पराभव करुन पॉईंट्स टेबलमध्ये आगेकुच केली. आता सनराईजर्स हैदराबाद सोडून सगळेच संघ दोन सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त तीन संघ दोन-दोन सामने जिंकले शकले आहे. तर गुजरातने दोन सामने खेळून ते दोन्हीही सामने जिंकले आहेत. तर पॉईंट्स तालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या केकेआरनं तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवलाय.
इतर बातम्या
Tumor : अग्नाशयापासून थेट नसांपर्यंत पसरला ट्यूमर… मग झाले असे काही की…