IPL 2022 Points Table: आयपीएलच्या गुणतालिकेत तुमचा संघ कुठे, तुमच्या आवडत्या संघाची आगेकूच की पिछेहाट?, जाणून घ्या

| Updated on: Apr 13, 2022 | 2:00 PM

काल आयपीएलमध्ये अखेर चेन्नई सुपर किंग्सची पहिल्या विजयाची प्रतिक्षा संपली. CSK ने RCB वर 23 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताने चेन्नईने (CSK) 216 धावा केल्या.  RCB ने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 193 धावा केल्या. यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत बदल झालाय.

IPL 2022 Points Table: आयपीएलच्या गुणतालिकेत तुमचा संघ कुठे, तुमच्या आवडत्या संघाची आगेकूच की पिछेहाट?, जाणून घ्या
आरसीबी तिसऱ्यावरुन पाचव्या स्थानी
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : काल झालेल्या सामन्यानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये काही बदल झाले आहेत. काल आयपीएलमध्ये (IPL 2022) अखेर चेन्नई सुपर किंग्सची पहिल्या विजयाची प्रतिक्षा संपली. CSK ने RCB वर 23 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताने चेन्नईने (CSK) 216 धावा केल्या.  RCB ने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 193 धावा केल्या. चेन्नईने रांगेत चार पराभव पाहिल्यानंतर त्यांना विजय मिळाला. आधी KKR, PBKS, LSG आणि SRH कडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. शिवम दुबे आणि रॉबिन उथाप्पा चेन्नईच्या यंदाच्या सीजनमधल्या पहिल्या विजयाचे हिरो ठरले. शिवम दुबेने तुफान फटकेबाजी केली. त्याने 46 चेंडूत नाबाद 95 धावांची खेळी केली. यात पाच चौकार आणि आठ षटकार होते. रॉबिन उथाप्पा संकटमोचक ठरला. त्याने बिनधास्तपणे फटकेबाजी सुरु ठेवली. त्याने 50 चेंडूत 88 धावा फटकावल्या. यात चार चौकार आणि नऊ षटकार होते. या CSK आणि RCB च्या सामन्यानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये बदल झालाय.

एकाहातानेच दिनेश कार्तिककडे थ्रो

सातव्या षटकात ग्लेन मॅक्सवेल गोलंदाजी करत होता. मॅक्सवेलचा ऑफ स्टंम्पवरील चेंडू मोइन अलीने कट केला. रॉबिन उथाप्पाने धाव घेण्यासाठी कॉल दिला. पण नंतर माघार घेतली. त्याचवेळी बॅकवर्ड पॉईंटला उभ्या असलेल्या सुयशने चपळाईने चेंडू पकडला व एकाहातानेच दिनेश कार्तिककडे थ्रो केला. कार्तिकने तितक्याच चपळाईने मोइन अली क्रीझमध्ये पोहोचण्याआधीच रनआऊट केलं. मोइन अलीने आठ चेंडूत तीन धावा केल्या.

चेन्नईच्या गोलंदाजांना फटकावलं

गोव्यासाठी खेळणाऱ्या सुयश प्रभुसदेसाईला RCB ने अवघ्या 30 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं आहे. आरसीबीच्या सराव सामन्यातच त्याने आपली क्षमता दाखवून दिली होती. या मॅचमध्ये त्याने 46 चेंडूत 87 धावा फटकावल्या होत्या. मोठे फटके खेळण्याची क्षमता असल्यामुळेच आजच्या सामन्यात त्याला संधी दिली. सुयश प्रभुदेसाईने आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 18 चेंडूत 34 धावांची वेगवान खेळी केली. यामध्ये त्याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला.

IPL पॉइंट्स टेबल

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स

14104200.316
राजस्थान रॉयल्स
1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

कोण कुठल्या स्थानावर?

काल झालेल्या आरसीबी आणि सीएसकेच्या सामन्यानंतर पहिल्या स्थानी राजस्थान रॉयल्स आहे. रॉयल्सने चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत. दुसऱ्या स्थानी केकेआर आहे. केकेआरनं पाच सामन्यांपैकी तीन सामने जिंकले असून दोन हरला आहे. त्यानंतर येतो एलएसजी. एलएसजी हा तिसऱ्या स्थानी असून त्याने पाच सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहे. त्यानंतर चौथ्या स्थानी गुजरात आणि पाचव्या स्थानी आरसीबी आहे. आरसीबीने पाच सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहे.

इतर बातम्या

‘भारत माझा देश आहे’ सिनेमाचा टीझर लाँच, जवानांच्या कुटुंबियांसोबत सोहळा साजरा

IPL 2022 MI vs PBKS Live Streaming: जाणून घ्या मुंबई विरुद्ध पंजाब सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

IPL 2022, Orange Cap, Purple cap : 9 षटकार मारुन उथप्पाची आगेकुच, ऑरेंज कॅपच्या यादीत कोण आहे पुढे? पर्पल कॅपवर कुणाचं राज्य?