IPL 2022 RR vs KKR Live Streaming: जाणून घ्या राजस्थान विरुद्ध कोलकाता सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

| Updated on: Apr 18, 2022 | 8:00 AM

गुणतालिकेत दोन्ही संघांचे स्थान पाहिल्यास राजस्थानचा संघ चौथ्या स्थानावर आहे. त्यांचे पाच सामन्यांत सहा गुण आहेत. त्याचबरोबर कोलकात्याचे सहा सामन्यात सहा गुण आहेत. हा संघ पॉईंट्स टेबलवर सहाव्या क्रमांकावर आहे.

IPL 2022 RR vs KKR Live Streaming: जाणून घ्या राजस्थान विरुद्ध कोलकाता सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
IPL 2022 RR vs KKR Live Streaming
Image Credit source: KKR / RR - Twiiter
Follow us on

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेचा आतापर्यंतचा 30 सामने खेळवण्यात आले आहेत. हा सुरुवातीचा टप्पा राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) चांगला ठरला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघाने पाचपैकी तीन सामने जिंकले आहेत, तर दोन सामने गमावले आहेत. गेल्या सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. आता पुढील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) संघ त्यांच्याशी दोन हात करणार आहे. सोमवारी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. राजस्थानने स्पर्धेची चांगली सुरुवात केली असली तरी दुसरीकडे, कोलकात्याच्या संघाकडे पाहिले तर सध्याचा हंगाम त्यांच्यासाठी संमिश्र ठरला आहे. त्यांनी सहा सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन सामन्यात त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे, तर श्रेयस अय्यरच्या संघाने तीन सामने जिंकले आहेत.

गुणतालिकेत दोन्ही संघांचे स्थान पाहिल्यास राजस्थानचा संघ चौथ्या स्थानावर आहे. त्यांचे पाच सामन्यांत सहा गुण आहेत. त्याचबरोबर कोलकात्याचे सहा सामन्यात सहा गुण आहेत. हा संघ पॉईंट्स टेबलवर सहाव्या क्रमांकावर आहे. आजचा सामना जिंकून दोन्ही संघांना आपली स्थिती मजबूत करायची आहे. दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी पाहता राजस्थानचा संघ थोडा वरचढ वाटतोय. परंतु कोलकात्याच्या संघात आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स हे दोन खेळाडू सर्वात घातक आहेत, जे कोणताही सामना फिरवू शकतात. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होईल यात शंका नाही.

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?

राजस्थान रॉयल्स आणि लखनौ कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना 18 एप्रिल (सोमवार) रोजी खेळवला जाणार आहे.

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल.

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) तुम्ही कुठे पाहता येईल?

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता

इतर बातम्या

DC vs RCB IPL Match Result: दिनेश कार्तिकच्या वादळापुढे दिल्ली उद्वस्त, बँगलोरचा चौथा ‘रॉयल’ विजय

DC vs RCB IPL 2022 Dinesh Karthik: ये एज-वेज में विश्वास नही रखता, सगळ्यांची एकच भावना, त्याला T-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये घ्याच

DC vs RCB IPL 2022: Virat Kohli चं नशीब खराब, जबरदस्त RUN OUT, पहा VIDEO