मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेचा आतापर्यंतचा टप्पा राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) उत्कृष्ट ठरला आहे. संघाने पाचपैकी तीन सामने जिंकले आहेत, तर दोन सामने गमावले आहेत. गेल्या सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. आता पुढील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) संघ त्यांच्यासमोर असणार आहे. सोमवारी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दुसरीकडे, कोलकात्याच्या संघाकडे पाहिले तर सध्याचा हंगाम त्यांच्यासाठी संमिश्र आहे. त्यांनी सहा सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन सामन्यात त्यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. तर तीन सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे.
पॉइंट्स टेबलमधील दोन्ही संघांचे स्थान पाहिल्यास राजस्थानचा संघ चौथ्या स्थानावर आहे. त्यांचे पाच सामन्यांत सहा गुण आहेत. त्याचबरोबर कोलकात्याचे सहा सामन्यात सहा गुण आहेत. पुढचा सामना जिंकून दोन्ही संघांना आपली स्थिती मजबूत करायची आहे. मात्र, यासाठी दोघांनाही संघात काही बदल करावे लागतील.
गेल्या सामन्यात राजस्थानचा संघ गुजरातविरुद्ध मैदानात उतरला तेव्हा त्यांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये ट्रेंट बोल्टचा समावेश नव्हता. दुखापतीमुळे तो गेल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. गुजरातच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखता न आल्याने राजस्थानला बोल्टची उणीव जाणवली. अशा स्थितीत बोल्ट परतला तर राजस्थानची गोलंदाजी मजबूत होईल. गेल्या सामन्यात त्याच्या जागी जेम्स नीशमला संधी देण्यात आली. परंतु नीशम काही विशेष करू शकला नाही, त्यामुळे जर बोल्ट परतला तर नीशमला बाहेर जावे लागू शकते. रॅसी व्हॅन डर डुसेनला गेल्या दोन सामन्यांत संधी मिळाली असली तरी तो छाप पाडू शकला नाही. मात्र, संजू सॅमसन रॅसीला आणखी एक संधी देऊ शकतो.
दुसरीकडे, कोलकात्याच्या संघावर नजर टाकली तर त्यांना अद्याप परफेक्ट टीम कॉम्बिनेशन मिळालेले नाही. गेल्या सामन्यात संघात काही बदल केले. अजिंक्य रहाणेला वगळल्यानंतर अॅरॉन फिंचची संघात निवड झाली. रसिक सलाम या मोसमातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी अमान खानला संघात स्थान मिळाले. त्याने एक षटक टाकले पण 13 धावा दिल्या. अर्थात, कोलकाता गेल्या सामन्यात पराभूत झाला असला तरी खेळाडूंना अधिक संधी देऊ इच्छित असल्याने संघात बदल करण्याची शक्यता दिसत नाही.
संजू सॅमसन (कर्णधार), जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, रॅसी व्हॅन डर डुसेन.
श्रेयस अय्यर (कर्णधार), अॅरोन फिंच, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन, सुनील नारायण, पॅट कमिन्स, अमन खान, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.
इतर बातम्या
DC vs RCB IPL Match Result: दिनेश कार्तिकच्या वादळापुढे दिल्ली उद्वस्त, बँगलोरचा चौथा ‘रॉयल’ विजय
DC vs RCB IPL 2022: Virat Kohli चं नशीब खराब, जबरदस्त RUN OUT, पहा VIDEO